Home Breaking News हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषी...

हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषी दिन कार्यक्रम संपन्न !

हिमायतनगर/..कृष्णा राठोड
कृषी विभाग , महाराष्ट्र शासन , व कृषी विभाग ,पंचायत समिती हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने
माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त हिमातयतनगर पंचायत समितीतील वसंतराव नाईक सभाग्रहात कृषिदिन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.व्हि.बळावंत साहेब हे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी राठोड मा.पंचायत समिती सदस्य, नायब तहसीलदार विकास राठोड ,तालुका कृषी अधिकारी बालाजी शेंनेवाड , .कृषी अधिकारी टारपे ,भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष- रामभाऊ सूर्यवंशी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक अंनगुलवार, समाजिक कार्यकर्ता दिनेश राठोड , अतुल राठोड गोरसेना तालुका उपाध्यक्ष ,भूमीराजा न्यूजचे शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड बोरगडीकर,कृषी सहाय्यक मांज़लकर, कृषी सहाय्यक कोटूलवार ,यांची प्रमुख उपस्थिति होती.

बालाजी शेंनेवाड कृषी अधिकारी यांनी माजी मुख्यमंती वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर सखोल असा प्रकाश टाकून ऊस्थितांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर नायब तहसीलदार विकास राठोड, उपस्तिथ सर्व मान्यवरांनी .माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकश टाकला.व सर्व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी यांचे सत्कार करण्यात आले.यामध्ये नामदेव आडे सरपंच पोटा, रघुनाथ जाधव, शंकर नाईक राम बंकट जाधव ,संतोष आडे,शामराव गडमवाड, बदुसिंग जाधव, ढगे, कवडे मामा वडगाव, अनिल पवार खडकी,आनंदराव पावर, शामराव राठोड , देवराव जाधव,पांडुरंग आडे, करण चव्हाण , कृष्ण राठोड, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता बालाजी राठोड यांच्या भाषणाने झाली.

वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती निमित्त तहसील कार्यालयाच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.

Previous articleभारतीय स्टेट बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा !
Next articleसर्वच सिम कार्ड कंपनीची कनेक्टिव्हिटी होतेय गायब