गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 01 जुलै 2022
हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगरच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन, विद्यार्थ्यांना खाऊ दिला.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री, हरीत क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर शाळेच्या वतीने सर्वांचा पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय स्टेट बँकेचे शाखाव्यवस्थापक स्वप्नील आखाडे सरांनी केक कापून, आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले भारतीय स्टेट बँकेचा आज वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने आमच्या शाखेकडुन आम्ही समाजातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी आम्ही शाळेचे मुख्याध्यापक यांना धनादेश सुपूर्द करीत आहोत. त्यांनी तो स्विकारावा. अशी विनंती करण्यात आली.
यावेळी फील्ड ऑफीसर अभय कोलगे, सर्विस मॅनेजर कौशल गणविर, अॅसिटंट मॅनेजर प्रतिक चांडक, प्रदिप जाधव, दत्ता महाराज, मिनल भोयर मॅडम, शिवानी खापरकर मॅडम, बालाजी बटनवाड, कृष्णा आणि शाळेचे मुख्याध्यापक संगमनेर सर, पंचायत समितीचे अधिकारी, जाधव सर, माने मॅडम, बुरकुले मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी, पत्रकार बांधव आदीची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन मुल्लासर यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव सर यानी मानले.
साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड जिल्हा संपादक यांंचा सत्कार करतांना जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक..