बीड, (जिल्हा प्रतिनिधी) :- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड येथे कार्यरत असलेले सहाय्यक पशूधन विकास अधिकारी डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे आपल्या पदावरुन दि ३० जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. सदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या सौजन्याने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बीड येथील श्रीराम मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विजय देशमुख यांच्या हस्ते डॉ कवठेकर यांनी पशुसंवर्धन खात्यात ३४ वर्ष ६ महिने उत्कृष्टपणे पशुवैद्यकीय सेवा प्रदान केल्यामुळे त्यांना सेवा सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात येवून गौरवण्यात आले.याप्रसंगी, आमदार सुनील दादा धांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी सभापती किरण बांगर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीहरी काका पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम धांडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शेतकरी तथा पशूचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सेवानिवृत्तीनंतरच्या त्यांच्या उर्वरित आयुष्यास सुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवर व शेतकरी यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त पशूधन विकास अधिकारी डॉ कवठेकर म्हणाले की, मी माझे उर्वरित आयुष्य हे शेतीकामात व्यतीत करुन फळबाग वाढीकडे लक्ष देवून ईतर शेतक-यांना पशूपालन आणि कमी खर्चात अधिक उत्पादन, उत्पन्न मिळवून देणा-या फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहणार आहे.