Home Breaking News हिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली.

हिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली.

नूतन पोलीस निरीक्षक का पुढे अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान ?

हिमायतनगर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड /-
तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे शहराला विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत त्यामुळे हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात मटका, गुटखा, अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे ह्या सर्व बाबी बंद करण्याचे आव्हान नूतन पोलीस निरीक्षक का पुढे असणार आहे त्यामुळे ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कामाकडे शहरासह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहेहिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी बी. डी. भुसनरे यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. हिमायतनगर शहर हे मटका, गुटखा आणि अवैध दारूविक्रीसारख्या अवैध धंद्याचे माहेरघर समजले जाते त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे या सर्व बाबी कडे नवीन पोलिस निरीक्षक भुसनर या अवैध धंदेवाल्यांवर काय कार्यवाही करणार ? याकडे हिमायतनगर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती गेल्या काही महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांत हिमायतनगर तालुक्यात झालेले एकापाठोपाठ खून, एका तरूणाचा चेंबरमध्ये पडून झालेला संशयास्पद मृत्यू अशा घटनांनी तालुक्यातील जनता दहशतीखाली वावरत आहे. सामान्यांना त्रास आणि गुन्हेगार मोकाट अशी स्थिती शहरात निर्माण झाल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था स्थिती राजकीय पुढाऱ्यांच्या घरी बसून मिटत असल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे येथील कायदा ढासळल्याचे जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलिस ठाण्यात नुकतेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनर हे मागील काळात हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम साहेबांनी येथील अवैध धंदे बंद करून केले होते ते भुसनर करतील का ? व पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्था स्थिती सुधारेल का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.़़

हिमायतनगर तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. तालुक्यात मटका, गुटखा, अवैध देशी दारू,राजरोसपणे सुरू आहे. हिमायतनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच मटक्याची बुकी दिवसाढवळ्या सुरू आहे. भुसनुरे हे हिमायतनगरात येऊन दोन दिवस झालेले असले तरी पोलिस ठाण्याजवळच व चौपाटी परिसरातील असलेली मटक्याची बुकी अजूनही त्यांच्या नजरेस कशी पडली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. हिमायतनगरात सुरू असलेल्या मटका व जुगारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. तरीही आजपर्यंत पोलिसांनी या जुगारांना अभय दिल्यामुळे ते राजरोसपणे सुरूच आहेत.
गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध मार्गाने गुटख्याची तस्करी केली जाते आणि त्याची खुलेआम विक्रीही केली जात आहे. अवैध देशी दारू आणि हातभट्टी विक्रीचा धंदाही जोरात सुरू आहे. परंतु या अवैध धंद्यांकडे पोलिसांकडून हेतु पुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे येथील अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले आहे त्यामुळे शहरात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चाललेले आहे येथील राजकीय कार्यकर्त्यांची पोलिसांशी हातमिळवणी असल्याशिवाय हे अवैध धंदे खुलेआम चालूच शकत नाहीत, हे उघड असल्यामुळे नवे पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनुरे या अवैध धंदेवाल्यांविरुद्ध कार्यवाही करून त्यांना पायबंद घालणार की ‘मागील पानावरून पुढे चालू’चा कित्ता गिरवतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Previous articleकारला ग्रामपंचायतीचे काम गावातील जनतेसाठी प्रेरणादायी……. प्रा.मारोती देवकर
Next articleडॉ प्रभाकर कवठेकरांनी डोंगराळ-मुरमाड जमिनीत फूलवली केशर आंब्याची बाग!