Home Breaking News परभणी जिल्ह्यातील निसर्गरम्य जांभूळ बेटावर यंदा घेण्यात येणार वृक्ष लागवड कार्यक्रम!

परभणी जिल्ह्यातील निसर्गरम्य जांभूळ बेटावर यंदा घेण्यात येणार वृक्ष लागवड कार्यक्रम!

परभणी जिल्हा प्रतिनिधी (आनंद ढोणे पाटील)

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात येणाऱ्या परभणी जिल्हा पालम तालूक्यात असणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील मधोमध एक निसर्गरम्य आणि पर्यावरण पूरक असे जांभूळ बेट वसलेले आहे. या बेटाच्या चोहोबाजूंनी नदी पात्रातील पाणी वेढलेले असते. बेटावर या पूर्वीच निसर्गवत विविध झाडे वाढलेली आहेत. अधिक करुन पक्षांनी फळ खाऊन आठोळी बीज सोडून दिल्यावर अपोआप उगवलेली जांभूळ वृक्ष वाढली असल्याने या बेटाचे नाव जांभूळ बेट असे झाले असावे.अनेक वाणांची झाडे असली तरी येथे अजूनही काही घनदाट वृक्ष संगोपन व्हावे आणि पर्यावरण संतुलित करण्यासाठी बेटावर वृक्ष लागवड केली जाते. यंदा २०२२ च्या पावसाळ्यात जुन, जूलै, ऑगस्ट महिन्यात देखील जांभूळ बेट संवर्धन कार्याअंतर्गत बेटावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जांभूळ बेट संवर्धन समितीचे पदाधिकारी व निसर्ग प्रेमींनी दिली आहे.मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या जांभूळ बेटावर जांभूळ बेट प्रेमींनी बेटावर एक आठवणीचे झाड लावावे त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली जावी. आपले झाड कमीत कमी ३ फूट उंचीचे व दिलेल्या योग्य ठिकाणी लागवड करावे. त्या झाडा सोबत जि पी एस कॅमे-याचा वापर करुन स्थळ, दिनांकासह संवर्धन समितीच्या मोबाईल क्रमांकावर फोटो पाठवावा.ह्या मोहिमेत बेटावर वृक्ष लागवड करणा-या प्रत्येकास जांभूळ बेट संवर्धन समिती तर्फे ऑगस्ट महिन्यात सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. निसर्गरम्य सुंदर जांभूळ बेटाच्या संवर्धनासाठी सर्व निसर्गप्रेमी, मित्र, स्नेही, शेतकरी यांनी सदर उपकृमात सहभाग नोंदवल्यानंतर या कामी सगळ्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. अधिकाधिक सर्वच स्तरातील मान्यवरांच्या सहकार्याने आधी देखील जांभूळ बेट संवर्धना करीता मदत केली आहेच.पर्यटकांच्या सोयीकरीता बोटी साठी शुध्दा साथ मिळाली होती. आता या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जांभूळ बेट संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous article🌹 झेप 🌹
Next articleकारला ग्रामपंचायतीचे काम गावातील जनतेसाठी प्रेरणादायी……. प्रा.मारोती देवकर