मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 05 जुन 2022
” पाणी हे जिवण आहे “
हे जरी माणवी जिवनातील सत्य कुणालाही नाकारता येत नाही.
पण हिमायतनगर या शहराचा ग्रामपंचायत पासुन ते नगरपंचायत ईतप्रयंचा दर्जा प्राप्त झालेले शहर म्हणजे हिमायतनगर….
हिमायतनगर शहराचा इतिहास हा पांडवकालीन पर्वापासुन आजतागायत जशास तसा आहे.
तो म्हणजे संबंध भारतात कुठेही न आढळणारी प्रभु परमेश्वराची साक्षात उभी मुर्ती ….
कनेकेश्वर तलाव येथील श्रीची गणपतीची मूर्ती, प्रसिद्ध असलेले बालाजी मंदिर, कालींकादेवीचे भव्यदिव्य मंदिर, जुन्या गावातील पवनपुत्र हनुमंतरायाचे मंदिर अशा अनेक इतिहासकांलीन साक्ष देणारी मंदिरे शहरात थाटात उभी आहेत. हिमायतनगर शहराचा हा वैभवशाली इतिहासाची परंपरा कुणालाही नाकारता येत नाही.
पण… सत्ता सारीपाठाच्या खेळात थेंबा ..थेंबा.. साठी तरसणा-या हिमायतनगर वाशीयांना पाण्यासाठी कधि सुखाचे येतील. हा येणारा काळच सांगेल. नगरपंचायतीच्या ढिसाळ राजकारणामुळे शहरातील नागरिकांना रात्रीबेरात्री पाण्याच्या थेंबा..न.. थेंबा साठी भटकंती करावी लागत आहे. हे वास्तव चित्र मी स्वतः बघितले आहे. पाण्यासाठी रात्रीचा दिवस करुन आपल्या घरातील पाण्याची टाकी कशी भरेल. हे एकच लक्ष नागरीकांचे असते.
या अमुक…तमुक… वार्डातील मीच भावी नगरसेवक आहे. असे म्हणुन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ज्यांनी आपल्या सोयीनुसार वार्डात पाणी पुरवठा केला… त्यांचे नांव आजपर्यंत तरी जनतेच्या मुखातून येत आहे. हेही या ठिकाणी नमुद करावे लागेल.
पण पुढील येणारे दिवस पाण्यासाठी भटकंतीचे जर असतील तर जागरूक नागरिक विचार करतील.
हिमायतनगर शहरवासीयांना भरपुर पाणी पुरवठा उपलब्ध होईल का? नाही. येणारा काळच सांगेल. पण एकहाती सत्ता असलेल्या राजकीय पक्षांचा… नाहीतर नागरीकांनी पाण्यासाठी भटकंती हा पुन्हा विषय निश्चित चर्चेला येणार. हेही सत्य नाकारता येणार नाही.