Home समाजकारण कृषीभूषण मेघा देशमुख यांची मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठ धामास  ( एक लक्ष)...

कृषीभूषण मेघा देशमुख यांची मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठ धामास  ( एक लक्ष) रुपयांची देणगी

परभणी/आनंद ढोणे पाटील
परभणी तालूक्यातील झरी गावच्या आणि विविध पुरस्कार प्राप्त प्रयोशिल महिला शेतकरी श्रीमती मेघाताई विलासराव देशमूख (सावंत) यांनी मातोश्री इंदिराबाई देशमूख वैकुंठ धाम स्मशानभूमीच्या विकासासाठी १ लाख रुपये नुकतीच देणगी दिली आहे. मेघाताई यांचे कृषी क्षेत्रात प्रेरणादायी कार्य तर आहेच शिवाय त्या सामाजिक उपकृमातही नेहमी सक्रिय सहभागी असतात. आता वैकुंठ धाम करीता देणगी दिल्याने त्यांच्या औदार्याची पंचक्रोशीतून प्रशंसा होत आहे. झरी येथील मातोश्री इंदिराबाई देशमूख वैकुंठ धाम स्मशानभूमी एक आदर्श म्हणून अख्ख्या मराठवाड्यात नावारुपाला आली आहे. येथील स्मशानभूमी करीता पूर्वी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची दोन एकर जमीन दान दिली होती. त्यानंतर सुशोभित बांधकाम करुन तेथे रंगरंगोटी केली, असंख्य वृक्ष लागवड करुन ऑक्सिजन पार्क निर्माण केले. त्यामुळे सदर स्मशानभूमी एक सुंदर स्वच्छ वैकुंठ धाम म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या प्रमाणेच जिल्ह्यातील काही गावात झरी पॅटर्न राबवला जात आहे.
आपल्या समाजात आजही विधवा, परित्यक्त्या महिलाना सन्मान प्राप्त होत नाही. खर तर महिलांनीच अशा महिलांना सन्मान देऊन समाजात आत्मसन्मानाने जगण्याचा धीर दिला पाहिजे. महिला ही एक फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीशी लढायला शिकले पाहिजे. असे मत कृषीभुषण कांतराव काका झरीकर यांनी याप्रसंगी सत्काराला उत्तरदायित्त्व म्हणून केले.
महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभुषण पुरस्कार प्राप्त मेघाताई देशमुख व श्री सचिन बाबुराव फुलारी यांची प्रतिबंधात्मक अधिकारी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वित्त मंत्रालय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
सत्कारमुर्तीचा सत्कार शिक्षणाधिकारी शिवश्री विठ्ठलराव भुसारे , कृषिभुषण कांतराव काका झरीकर , माणिकराव केरवाडीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
सत्काराला उत्तर देताना पुरस्कार प्राप्त मेघाताई देशमुख म्हणाल्या की, ” हा पुरस्कार माझा एकटीचा नाही तर संपूर्ण महिलांचा सन्मान आहे. येणाऱ्या संकटाना सामोरे जायचे बाळकडू मला वडीलांनी दिले. त्यामुळे डोंगरा ऐवढ्या दुःखाचा सामना करत मला इथ पर्यंत यश मिळवता आले*.महिलांनी आपल्या कर्तृत्वाचे डोंगर उभे केले पाहिजे.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ” मला मिळालेले पुरस्काराचे ५० हजार रूपये व माझे ५० हजार रुपये. अशी एकून १ लक्ष रूपये मी झरीच्या कै. इंदीराबाई देशमुख वैकुंटधामाच्या रंग रंगोटी आणि इतर विकासासाठी देत आहे अशी घोषणा केली.*
प्रसंगी साचिन फुलारी यांनी युवकांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य ठेऊन कष्ट करण्याचे आवाहन केले.
समारोप प्रसंगी शिक्षणाधिकारी
विठ्ठलराव भुसारे यांनी, ” आज दोन्ही सत्कारमुर्तीचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत आहे कारण हे आपल्या परिसरातील स्वकर्तृत्वाने सिध्द झालेले परीस आहेत.यांचा आदर्श घेवून पुढे गेल्यावर नक्कीच सामाजातील अनेकांच सोन झाल्या शिवाय राहणार नाही.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सुभाष जाधव यांनी तर सुत्रसंचलन शाम गाडेकर यांनी केले व आभार सुभाष ढगे यांनी मानले.

Previous articleमराठवाड्यातील शेतकऱ्यांची तेलंगणातील कपाशी बियाण्याला पसंती
Next articleअनिल मादसवार यांना संभाजीनगर येथे देवऋषी नारद पत्रकारीता पुरस्कार प्रदान