Home Breaking News डिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.

डिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक – 02 जुन 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे रतणवाडी तांडा येथील गावाजवळील डिपीची आर्थिंग नादुरुस्त वायर तुटल्याने, डिपीजवळील जमीनीवर उतरल्याने एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी शेळी जखमी झाली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. असे तेथील नागरीकांनी सांगितले.
पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. मागील काहीदिवसा पुर्वी याअगोदर नागरीकांनी महावितरण कंपनीकडे तक्रार दाखल दिली होती. पण त्या अर्जाची अजुन दखल घेतली नाही. हेहु विशेष आहे. आजच रमणवाडी तांडा येथील डिपीवरील तुटलेल्या वायराची दुरुस्ती तात्काळ करावी. पुन्हा कुठलीही जिवीतहानी होणार नाही. यांची दखल घ्यावी. नाहीतर नागरीकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना जयंती निमित्त नाशिक मध्ये अभिवादन
Next articleबाणाक्षरी