👉 ” आभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे….”
@ कृषि वार्तापत्र @
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -30 जुन 2022
पावसासाठी हतबल झालेला बळीराजा पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे.
हिमायतनगर तालुक्यात एकच मोठा पाऊस झाला. म्हणून पेरणी केली पण आठ दिवस झाले. पावसाचा पत्ताच नाही. पिकांच्या जमिनीवरील उगवत्या अंकुराला पावसाची गरज आहे. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची नेहमीच गर्दी दिसून येते. पण पाऊस पडतच नाही.
शेतक-यांच शेतीचे अर्थकारण यावर्षी वेळेवर पाऊस भरपुर पडला नाही तर, बिघडण्याची शक्यता अनुभवी शेतकऱ्यांनी बोलुन दाखवली.
काळया आईची ओटी भरुन, पिकांचे अंकुर वर येयायला तयार नाही. कारण पाऊसच नाही. हताश झालेला शेतकरी बांधवांचे हे वास्तव चित्र सोशल मिडिया वरच्या ग्रुपवर व्हायरल झाले.
आणि ” आभाळागत माया तुझी आम्हा शेतकऱ्यांवर राहु दे…”
असेच टेंभुर्णी येथील प्रगतिशील शेतकरी कैलास कदम यांनी आमच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या भावना बोलुन दाखविल्या . शेवटी ते म्हणाले शेतक-यांना कोणीही वालीही नाही…
सरकार येतील, सरकार जातील पण बळीराजाला मदत करणारे सरकार हवे.
आपला छोटासा फोटो ग्राफर म्हणुन मी शेती करतो, पण आज रोजी माझे पाच ते सहा सोयाबीन बॅगची हि अवस्था आहे.
त्वरीत तालुका कृषि अधिकारी आणि संबंधित यंत्रना यांनी माझ्या शेताची पाहणी करून, मला आर्थीक मदत देण्याची मागणी, कैलास कदम टेंभुर्णीकर यांनी केली आहे.
👉 राजकारण राज्यांचे
आठ-दहा दिवसांच्या राज्याच्या राजकीय नाटयतरांनंतर एक वेगळा मोड घेतला आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक चौका-चौकात एकच चर्चा. सरकार बदलणारं.. सरकार बदलणारं..
आलेल्या नवनिर्वाचित भाजप आणि त्यांचे सहकारी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का? असा आशावाद जमलेल्या शेतकऱ्यांनी बोलुन दाखवला.