Home Breaking News हिमायतनगर पोलिसांनी वाचवले जखमी हरणाचे प्राण …….!

हिमायतनगर पोलिसांनी वाचवले जखमी हरणाचे प्राण …….!

👉🏻 सा.पो.नि.चौधरी यांच्या कार्यतत्परतेने हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान

हिमायतनगर प्रतिनिधी कृष्णा राठोड/– शहरातील वडगाव शिवारात जखमी झालेले हरिण जिवाच्या आकांताने तडफडत होते हे पाहताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक विजय आऊलवार व कुलकर्णी हे पोलीस तपासा दरम्यान वडगाव मार्गे इस्लापुरला जात असताना त्यांना रस्त्यात एका अपघातात हरिण जखमी असल्याचे दिसून येताच त्यांनी कसलाही विचार न करता तात्काळ त्या हरणास पोलीस गाडी मध्ये टाकून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे नेऊन पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांना त्याच्यावर पुढील उपचार करण्यास सांगितले त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी ह्यांच्या कार्य तत्परतेने जखमी असलेल्या हरणाचे प्राण वाचले व त्याच्यावरील उपचारा नंतर त्याला जंगलात सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी सांगितले

Bhumiraja news…..
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौजे वडगाव शिवारात दि 28 जून रोज मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास एक हरीण जंगलाची वाट चुकल्याने ते येथील राष्ट्रीय महामार्गावर आल्याने त्याचा अपघात झाला व ते हरणाचे पाडस आपला प्राण वाचविण्यासाठी जखमी अवस्थेत सैरभैर इकडे तिकडे धावत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले पण कुणी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तितक्यातच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक विजय आऊलवार व कुलकर्णी हे पोलीस तपासा दरम्यान वडगाव मार्गे इस्लापुरला जात असताना वडगाव परिसरात एक वाहनाच्या धडकेत जखमी झालेले हरिण जिवाच्या आकांताने तडफडत असल्याचे पाहताच त्यांनी त्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उचलून आपल्या पोलीस गाडीतून हिमायतनगर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले त्यामुळे हिमायतनगर येथील पोलिसांच्या कार्य तत्परतेने आज एका जखमी हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले असल्याचे परिसरातील नागरिकांन मधून बोलल्या जात आहे
या जखमी हरणावर हिमायतनगर येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी उपचार करून त्या हरणाच्या पाडसाला शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले असल्याचे सांगितले

Previous articleचंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात पार पडली डिजिटल कार्यशाळा
Next articleनगरपंचायतीच्या मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा..