👉 मंडळ कृषि अधिकारी टारफे
जि.के.
मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 28 जुन 2022
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत तालुक्यात जी गावे या योजनेत समाविष्ट आहेत. त्या त्या गावातील शेतकरी बांधवांनी ठिबक, तुषार, यांत्रिकीकरण, शेटनेट हाऊस, पाॅलीहाऊस, नेडेप, वर्मीकंपोष्ट आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन हिमायतनगर तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी जि. के. टारपे यांनी केले आहे.
सवना ज. येथील कृषि संजीवनी सप्ताह निमित्ताने ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शेतक-यांनी सोयाबीनची पेरणी बिबिएफ यंत्राने केल्यास उत्पादनात वाढ होते. पिकांना जमिनीच्या आतुन म्हणजेच पिकांच्या बुंध्याशी अंतर ठेवून खते द्यावीत. वरुन पिकांना खते दिल्यास ती पिकांना पुर्णपणे त्याचा उपयोग होत नाही.
फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करून पिकांना फवारणी करावी.
असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी उपस्थित कृषि सहाय्यक नंदनवार, समुह सहाय्यक साईनाथ अन्नछत्रे, कृषि मित्र, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मारोती अक्कलवाड पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन गोपेवाड पाटील, गणेशराव भुसाळे, प्रकाश अनगुलवार, साहेबराव बिरकलवार, यादवराव बिरकलवार, माजी पो.पा.गणपत पाटील गोपेवाड, श्यामजी गायकवाड, रामदास फेदेवाड, रंगराव भुसाळे, बाबुस ढाले, कैलास अनगुलवार, प्रेम भुसाळे, भारत गुंडेवार आदी शेतकरी उपस्थित होते.