Home Breaking News हिमायतनगर रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघड!

हिमायतनगर रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघड!

👉 तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांच्या रांगाच रांगा.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 27 जुन 2022

हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील,
तिकीट मशीन सुरु करुन, प्रवाशांना दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी एक संदेशा द्वारे केली आहे.

हिमायतनगर रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या कारणास्तव नांदेडला अनेक प्रवासी जात असतात. रेल्वेस्थानकावर तिकिट काढण्यासाठी रांगेत उभा राहिलेल्या प्रवासांना प्रत्यक्ष अनुभव आला आहे. एका प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तंबल 30 मिनिटे लागली. पण माझ्यासहित असंख्य शेकडो जेष्ठ, श्रेष्ठ, पुरुष बांधव, माता भगिनी, युवक – युवती विध्यार्थी अशा असंख्य लोकांना तिकिटासाठी रांगेत, उभे राहून तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. ह्या सगळ्या अडचणी तिकीट मास्तरला उशिरा चालू करत असल्यामुळे व तिकीट वेटिंग मशीन बंद असल्यामुळे, प्रवाशांना तेंव्हा कळाल्या. हिमायतनगर रेल्वेस्थानकवर प्रवाशांना माहित अश्या एक नाही, तर अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे, त्यात पुरुष व महिलांना स्वतंत्र शौचालय नाही. प्रवाशांची ही अडचण दूर झालीच पाहिजे. असा ठाम निर्धार करत मी स्वस्त बसणार नाही. असा खडा सवाल दिनेश राठोड यांनी केला आहे.
प्रवाशांमध्ये काही रुग्ण असतात. त्यात जेष्ठ नागरिक असतात. कोणत्याही कारणाने उदा. दवाखान्यात जायायचे असेल तर, जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी, अथवा आपल्या पाल्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील असंख्य व्यापारी बांधव नांदेडला राहुन हिमायतनगर येथे येणे-जाणे करतात. हेही सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे या तिकिटाच्या गैरसोयीमुळे रुग्णांसहित, अधिकारी, कर्मचारी प्रवाशांची खुपच गैरसोय होत आहे. हे होत असलेली गैरसोय दूर करुन, तमाम प्रवाशांना दिलासा द्यावा, ही रेल्वे विभागाला नागरीकांनी विनंती केली आहे. हि समस्या लवकर न सुटल्यास, संबंधित स्टेशन यंत्रणे विरुद्ध तक्रार नोंदवणार आहे. ही समस्या स्टेशन वरील असंख्य अडथळे ज्यात, रात्रीच्या वेळेत स्टेशनवर लाईट न चालू राहणे, स्टेशन वरील स्वच्छता, प्रवाशांना बसण्यासाठी बसण्याची व्यवस्था नाही. अश्या सर्व बाबींचा आढावा घेऊन हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील सर्व निष्क्रिय बाबी,, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय.श्री. रावसाहेब दानवे पाटील साहेब यांना भेटून ह्या सगळ्या समस्याचे निवेदन देऊन व्यथा मांडणार आहे. असेही दिनेश राठोड यांनी सांगितले.

Previous articleवडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..
Next articleपोखरा योजने अंतर्गत विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.