Home कृषीजागर अखेर.. पाऊस बरसला!

अखेर.. पाऊस बरसला!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-26 जुन 2022

कधी हलका कधी मध्यम पाऊवाच्या सरी पडत मृग नक्षत्र असेच गेले. मात्र 25 जुन्या सायंकाळी चांगलाच पाऊस पडला. आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हळद, कापुस लागवड केली. सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर आता मोठ्या पावसाची अत्यंत गरच होती.

ओढे, नाले खळखळून वाहु लागले. हा पाऊस सर्वदूर पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
बियाण्याचा अंकुर मातीचे टोपण पांघरुण बसला होता. या भिजपावसाने ते मातीचे टोपण निघुन न्हाऊन निघाले. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न आता सुटला असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
काही दिवसांनी भुमाता हिरवा शालू परिधान करून, सर्वत्र हिरवळ दाटे चोहिकडे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.👉 कापड दुकानात गर्दी.
पाऊस सुरू झाला आणि रेनकोट, छत्री, मेनकापड यांच्या खरेदीसाठी कापड दुकानात एकच गर्दी दिसून आली.

Previous articleपळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत
Next articleवडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..