Home Breaking News पळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत

पळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत

अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा डाव गस्त मुळे फसला

हिमायतनगर प्रतिनिधी/ पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत असुन यामुळे शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा चोरट्यांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या गस्त मुळे चोरट्यांनी पळ काढला आहे.दोन दिवसांपासून विज पुरव बंद असल्यामुळे चोरटे सक्रिय होत आहेत. महावितरण च्या उप कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन तात्काळ विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पळसपुर येथील नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातील पळसपुर येथे दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.त्यांनतर पुन्हा शुक्रवारी रात्री देखिल चोरट्यांनी गावातील लाईट गेल्याची संधी पाहत अंधाराचा फायदा घेत गावात शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील तरुणांच्या सुरू असलेल्या गस्तमुळे चोरटे पळून लावण्यात यश आले आहे.
विज पुरवठा सुरळीत होत नाही रात्रीच्या वेळी अचानक विज गुल होत आहे. यामुळे गावातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे सबस्टेशन असुन देखील विज पुरवठा विस्कळीत का होतो याबद्दल महावितरणचे अधिकारी लक्ष का देत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत यातच चोऱ्यांचे सत्र सुरू आहे पळसपुर येथील दोन दुकाने फोडली होती एका घरमालकास चोरट्यांनी मारहाण करीत गावात धुमाकूळ घातला होता.त्यामुळे गावातील नागरीकांनी चोरट्यांसाठि गावात दररोज गस्त सूरू केली आहे. दोन दिवसांपासून गावातील विज पुरवठा बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य झाले आहे याचा फायदा घेत चोरटे गावात शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीच्या जबाबदार उप कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन येथील सिंगल फेज डी. पी.निकामी झाल्यामुळे तात्काळ नवीन बसविण्यात यावा आणि विज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी पळसपुर ग्रामस्थांनी केली आहे.

विज पुरवठा सुरळीत नाही केल्यास आंदोलन करू – सरपंच वाडेकर
पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून बंद असुन यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. चोरट्यांच्या धास्ती ने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीने लक्ष देऊन तात्काळ विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर नागरीकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन पाटील देवसरकर सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous articleअखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित
Next articleअखेर.. पाऊस बरसला!