Home राजकारण खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा...

खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम!

तमाम शिवसैनिकातून होतेय अभिनंदन!!
परभणी, ( आनंद ढोणे पाटील) :- हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप सोबत युत्ती करुन नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तिन चार दिवसापासून शिवसेने सोबत बंड करीत आपल्या विचारसरणीशी सहमत आसलेल्या शिवसेना पक्षाचे व ईतर अपक्ष अशा जवळपास ४२ पेक्षा अधिक आमदाराची मोट बांधून त्यांना सोबत घेऊन आधी सुरत आणि आता आसाममधील गुहावटी येथील एका खासगी रेस्टॉरंट हाॅटेलात मुक्कामी राहून तेथे विविध राजकीय खलबते करत शिवसेना पक्ष प्रमूख तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय उध्दवजी ठाकरे यांना वेठीस धरुन बंड पुकारले आहे. त्यामुळे हिंदूह्दयसम्राट शिवसेना प्रमुख स्व:बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर कडव्या शिवसैनिकात बंड करणाऱ्या आमदारा विरुद्ध असंतोष खदखदत असताना परभणी लोकसभेचे लोकप्रिय शिवसेना खासदार संजयजी जाधव तसेच परभणी विधानसभा शिवसेनेचे लोकप्रिय आमदार डॉ राहूल पाटील हे मात्र शिवसेना पक्षाशी निष्ठा राखत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या सोबत राहून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठाम उभे राहिले आहेत. या दोघा शिवसेनेच्या वाघांनी परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायमच असल्याचे दाखवून दिले असल्याने परभणी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांना शाब्बासकी देत त्यांचे अभिनंदन करु लागले आहेत.परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे पहिले खासदार म्हणून स्व: अशोक आनंदराव देशमुख हे निवडून आले. शिवसैनिकांच्या भक्कम साथीने शिवसेना पक्षाला मान्यता मिळाली. त्यांच्या नंतर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश जाधव हे शिवसेना पक्षातून बहुमताने निवडून येत खासदार झाले. परंतु, कालांतराने त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन पक्ष सोडला तरी त्यांच्या मागे कोण्हीच न जाता शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख स्व:बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकमत राहीले.पुढे गद्दारी करणारांचे राजकारणात मोठे नाटक झाले. यानंतर परभणी विधानसभा शिवसेनेचे धडाडीचे आमदार संजय जाधव हे लोकसभेवर निवडून आले. तब्बल दोन वेळा ते बहुमताने निवडून येत आहेत. त्याच बरोबर परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतून दोन वेळा विविध विकास कामाची पावती म्हणून शिवसैनिक डॉ राहूल पाटील यांना निवडून देत आहेत. हे दोघेही शिवसेना पक्षप्रमुख स्व:बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे, युवासेना प्रमुख नामदार अदित्यजी ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असून ते शिवसेनेतच कायम आहेत. त्यामुळे परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा एकदा नावारुपाला आला असून त्यांचे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक व शेतकरी बांधवातून कौतुक होताना दिसत आहे.

Previous articleविठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.
Next articleअखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित