Home Breaking News महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदे चा सुवर्ण इतिहास

महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदे चा सुवर्ण इतिहास

आशियाई कुस्ती स्पर्धा मध्ये सुवर्णपदक

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

आशियाई कुस्ती स्पर्धा 2022 किर्गिस्थानच्या बिश्केक येथे सुरु असून 17 वर्षा खालील व 49 किलो वजनी गटात आशियाई कुस्ती स्पर्धा मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रा च्या अहिल्या शिंदे ने अंतिम सामन्यात जपानच्या मसुदा एन हिचा अंतिम फेरीत पराभव करीत सुवर्णपदक पटकावले व इतिहास घड़वला.
या संपूर्ण आशियाई कुस्ती स्पर्धामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत अहिल्याने किर्गिस्थान, उझबेकिस्थान, कोरिया, कझाकिस्थान व अंतिम फेरीत जपान च्या कुस्तीपटू सह वरील देशातील प्रतिस्पर्धाला एकही गुण घेऊ दिला नाही व या सर्व देशाच्या कुस्तीपटूना चारीमुंड्या चितपट करुन सुवर्ण इतिहास घडवून सुवर्णपदक प्राप्त केले.
यापुर्वी अहिल्याने झारखंड राष्ट्रीय कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा व 15 वर्षाखालील राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या कुस्ती स्पर्धा मध्ये सुवर्णपदक प्राप्त करुन नंतर उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या कुस्ती स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिकून आशियाई कुस्ती स्पर्धा साठी आपली दावेदारी सिद्धध केली होती.
आता आशियाई कुस्ती स्पर्धामध्ये अहिल्याने सुवर्णपदक जिंकून aआंतररार्ष्ट्रीय स्तरावर भारत देशाची मान ताठ केली असुन हि स्पर्धा जिंकणारी अहिल्या शिंदे पहिली महाराष्ट्ररीय न महिला कुस्तीपटू ठरली आहे. अहिल्या शिंदे च्या या ऐतिहासिक कामगिरी करीता तिच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleगौर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून प्रशांत भैय्या ढोणे निवडणूक लढवण्याची चिन्हे
Next articleविठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.