परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून परभणी जिल्ह्यातील ज्या त्या गट आणि गणातील सर्वच पक्षाच्या ईच्छूक उमेदवारांनी आपल्या ग्रामीण भागात चाचपणी सुरु केली आहे. लोकसंख्या वाढीनुसार गट व गणाची संख्या निवडणूक विभागाने वाढवली आहे.यातच परभणी जिल्हा पूर्णा तालूक्यातील गौर जिल्हा परिषद गटात येणा-या गौर पंचायत गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पांगरा लासिना येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात नेहमी हिररीने भाग घेणारे, गोरगरिबांच्या सुखा दुखात तथा सामाजिक समस्येकरीता धावून येणारे,या भागातील शेतकऱ्यांचा शेकडो टन ऊस धडपड करुन साखर कारखान्याकडे गाळपासाठी नेला आहे. या पुढे देखील गरिबांच्या विकास कामासाठी प्रशांत भैय्या प्रकाशराव ढोणे पाटील हे निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसून येत असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसी तयारी सुरु केली आहे. प्रशांत भैय्या ढोणे यांचे वडील प्रकाश शेषराव ढोणे पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर पंचायत समितीचे एकेकाळी सभापती होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांगीण विकास कामात सदर पंचायत समिती महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आणली होती. आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रशांत भैय्या ढोणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. त्यांनी गौर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी, असी गौर गणातील गौर, बरबडी, गोविंदपूर, आडगाव लासीना, पांगरा लासिना, आडगाव-सुगाव, न-हापूर येथील कार्यकर्ते व तमाम नागरिक यांनी तयारी चालवली असल्याने ते निवडणूक लढवण्याची चिन्हे स्पष्ट होत . ढोणे पाटील यांच्या घराण्याकडे सामाजिक विकास कार्याची नाळ असल्यामुळे त्यांच्या नावास जोरदार समर्थन मिळणार आहे.