परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील काही भागासह पूर्णा तालूक्यात मंगळावर २१ जून २०२२ रोजी रात्री ७ वाजल्यापासून उशिरापर्यंत रिपटीप पाऊस पडून जोरदार प्रजन्यवृष्टी झाली. मृगनक्षत्रा पासून शेतकरी पाऊसाची प्रतिक्षा करीत होता. आता चांगला पाऊस झाल्याने बळीराजा- शेतकरी काही अंशी आनंदला आहे. पूर्वी भुईमूग पीक असलेल्या जमीनीत खरीप पेरण्या करण्यायोग्य पाऊस झाला आहे तर कोरडवाहू क्षेत्रात पेरणीसाठी आणखी एका पाऊसाची गरज आहे.पाऊसाची वाट पाहणारा शेतकरी मंगळवारी पडलेल्या पाण्याने खरीप पेरणीच्या पूर्वतयारीस लागला आहे. काही शेतकरी जनावरांच्या गोठ्याच्या दुरुस्तीची कामे करताहेत.