Home राष्ट्रीय हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

हिमायतनगर  येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उतशात शिबिर संपन्न झाले. या शिबिरासह ६०० हुन अधिक साधकांनी उपस्थिती लावून शिबिराची शोभा वाढविली. यावेळी करो योग्य राहो निरोग… हातात माता कि जय…वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता.

वाढोणा येथे गेल्या महिन्याभरापासून योग्य शिबीर, सहयोग प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. दरम्यान आज दिनांक २१ जून रोजी ‘अंतरराष्ट्रीय योग दिन’ आल्याने या दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील पतंजली योग समिती आणि श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास हरिद्वार येथील संत कौशलदासजी महाराज, माहूर येथील महंत श्याम भारती महाराज यांनी उपस्थित होऊन शिबिराची सुरुवात केली. सर्व प्रथम दोन्ही स्वामीजींच्या हस्ते भारमाता, श्री परमेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, हुजपाच्या प्राचार्य उज्वला सदावर्ते, पोलीस निरीक्षक भुसनर, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, यांच्यासह अनेक मान्यवर शिबिरासाठी खासकरून उपस्थित झाले होते. उपस्थित झालेले स्वामीजी आणि मान्यवरांचा हिमायतनगर योग समितीचे अक्कलवाड सर, प्रवीण जन्नावार, गजानन चायल, आशिष सकवान, पांडुरंग तुप्तेवार, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच ओमशांती केंद्राच्या वतीने शीतल दीदी आणि संध्या दीदी यांनी दोन्ही स्वामीजींना श्रीकृष्ण परमात्मा प्रतिमा देऊन स्वागत केले.

त्यानंतर योगगुरू तथा जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती नांदेडचे श्री सुरेशजी लंगडापूरे, जिल्हा सहप्रभारी पतंजली योग समिती नांदेडचे अशोकजी पवार यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित झालेल्या विद्यार्थी, नागरिक व योग्य साधकांना योगाचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व शासकीय व निमशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी शिबिरासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना नाश्ता व सरबताचे वितरण करण्यात आले.

शेवटी वंदे मातरम गीताने शिबिराचा शानदार समारोप करण्यात आला. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मिलिंद जन्नावार, माधुरी तिप्पनवार, बाळू अण्णा चवरे, संतोष गाजेवार, परमेश्वर इंगळे, साहेबराव आष्टकर, गौतम पेंटर, उदय देशपांडे, शरद चायल, राजु पिंचा, अनिल मादसवार, सुभाष बल्पेवाड, अनिल नाईक, नाथा गंगुलवार, रामभाऊ सुर्यवंशी, खंडु चव्हाण, निलेश चटने, गोपाळ नप्ते, प्रमोद तुप्तेवार, विठ्ठल देशमवाड, गोविंद कदम, उषाताई देशपांडे, दर्शन चायल, जयश्री पाटील, सुनंदा दासेवार, प्रेमालाताई गुंडेवार, नप्ते मैडम व अन्य महिला, तसेच अविनाश संगनवार, अमोल धुमाळे, गजानन मनमंदे, उत्कर्ष मादसवार, हुजपाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, क्रीडा संचालक डॉ. दिलिप माने यासह हिमायतनगर पतंजली समितीच्या सर्व साधकांनी परिश्रम घेतले.

भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड
📲9145043381

Previous articleआकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पण शेतकरी पावसासाठी हैराण..
Next articleपूर्णा तालूक्यात जोरदार प्रजन्यवृष्ठी