मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड.
दिनांक:- 21 जुन 2022
कुठे पाऊस, तर कुठे ऊन, कुठे पावसाची हलकीशी लहर….तर कुठे काळ्याकुट्ट ढगांची आकाशातील केलेली गर्दी….
हे वास्तव आहे, संबंध नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे…. प्रचंड महागाईमुळे सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? ना.सरकरचे लक्ष.ना प्रशासनाचे.
खरीप हंगामातील मशागतीचे अतिशय महत्त्वाचे कामे आटोपून बळीराजा काळया आईची ओटी भरण्यास सज्ज झाला..
पण पाऊस, महागडे बियाणे,खते, ईतर खर्च हा शेतकरी बांधवांसाठी न पडणारा खर्च…
👉 कृषि अधिकारी झाले लालची वृत्तीचे….
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत ठिबक, तुषार, सिंचन विहीरची कामे चालू आहेत. पण शासनाच्या बिलापेक्षा अधिक एक लाख रुपये रक्कम खर्च करुन, सदरील योजनेचा लाभ घेतला.
तरीही शासकीय कर्मचारी , अधिकारी यांनी संबंधित लाभार्थ्यांना वेगवेगळ्या नियम व अटी घालून, आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडे लक्ष दिले.
हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी त्वरित या बाबींकडे लक्ष देवुन, सदरील शेतकऱ्यांना पोखरा अंतर्गत सिंचन विहिरीचे बिल मिळावे. याकडे लक्ष देऊन, भ्रष्टाचारांनी पोखरलेल्या हिमायतनगर येथील कृषि अधिकारी यांना चपकार दाखवावी. हि संबंध हिमायतनगर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.