एसबीआय आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक पांडूरंग निनावे यांचे आवाहन
परभणी, (आनंद ढोणे पाटील)- परभणी जिल्ह्यातील शेतकरी, मुले, मुली आणि बचत गटातील महिला, पुरुष यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने रेशीम कोष उद्योग करता यावा, यासाठी आज दि २० जून २०२२ पासून एस बी आय-आरसेटी ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, दादाराव प्लाॅट, संभाजीनगर, आरटीओ च्या पाठीमागे येथे संस्थेच्या वतीने सर्व ईच्छूकांना रेशीम कोष उद्योग प्रशिक्षण हे मोफत दिले जाणार आहे.याकरिता प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ४५ वर्ष असणे आवश्यक आहे. नाव नोंदणी साठी ईच्छूकांनी सोबत ४ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड,मनरेगा जाॅब कार्ड किंवा बी पी एल कार्ड, ग्रामपंचायत रहिवासी किंवा रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला टि सी, बचत गटातील महिला पुरुष रोजगार हमी योजनेत १०० दिवस काम केलेली नोंद ह्या कागदपत्रांची झेरॉक्स आणणे आवश्यक असून निवड झालेल्या नागरीकांना १० दिवस मोफत उत्कृष्टरीत्या रेशीम उद्योगाची संपूर्ण माहिती देवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच फराळ, चहा, जेवण याची व्यवस्था आहे.असोसिएट प्रोफेसर डॉ चंद्रकांत लटपटे यांचे दहा दिवस उत्कृष्ट मार्गदर्शन लाभणार आहे. एस बी आय- आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही गत दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील सर्व गटातील महिला पुरुष, मुले, मुली (१८ ते ४५ वयोगटातील), शेतकरी यांना मोफत प्रशिक्षण देत असून अनेक प्रशिक्षणार्थींनी आपले उद्योग चालू करुन आर्थिक सुबता मिळवली आहे. सदरील रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ परभणी जिल्ह्यातील ईच्छूकांनी घेऊन शेतीत स्वयंरोजगार उभारावा असे आवाहन एस बी आय आरसेटीचे संचालक पांडूरंग निनावे सर ( संपर्क क्रमांक 8446412399) यांनी केले आहे.