Home कृषीजागर पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!

पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!

👉 निरभ्र आकाशाकडे सर्वांच्या नजरा.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक:- 20 जुन 2022

खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा अजुनतरी पत्ताच नाही. कशाचिही पर्वा न करता बळीराजाने कापुस, हळद या पिकाची लागवड केली. परंतू कोरड्या आभाळाने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे.
हवामान खात्याने मान्सुन अंदमानात दाखल झाला. दहा जुन प्रयंत महाराष्ट्र येईल. असा अंदाज वर्तविला होता. परंतु हा हवामान खात्यांचा अंदाज खोटा ठरला. माणुस हा आशेवर जगतो. परंतु आशेची निराशा यावर्षीच्या पावसाने केली आहे.
महागडे बियाणे, खते आणुन शेतकरी बांधव पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
मशागतीचा न परवडणारा खर्च, कृषि निविष्ठांची खरेदी, वाया गेलेला वेळ, वेळेवर न पडणारा पाऊस या शेतीसाठी घातक बाबी आहेत. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
येत्या दोन ते तिन दिवसांत पाऊस नाही पडला तर, शेतकऱ्यांना कपाशीची लागवड दुबार करावी लागणार हे मात्र निश्चित आहे.

Previous articleअपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप
Next articleग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा