Home Breaking News अपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप

अपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

नाशिक येथील गंगापूर गावातील देशी स्थान हॉटेल आगळी वेगळी कहाणी. एका अपंग व्यक्ती ने समाजातील इतर व्यक्तींसाठी एक एक व्यावसायिक कहाणी निर्माण केली आहे. कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करताना फक्त बुद्धीचे गरज असते. किंवा आत्मविश्वासाची गरज असते. या व्यक्तीने समाजापुढे अशी एक वेगळी प्रेरणादायी कहाणी समोर ठेवली आहे. याप्रसंगी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके जिल्हा सरचिटणीस समाधान भाऊ बागल शहरप्रमुख श्याम गोसावी. वैभव रोकडे यांनी या प्रसंगी या हॉटेल ला भेट दिली असता खरंच आनंद खूप काही वेगळा होता. आणि त्या कुटुंबाचे च्या परिवाराचे अभिनंदन केले. आणि त्यांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. त्या व्यवसाय का चे नाव प्रफुल्ल बंकटलाल जी मंत्री जन्म नाशिक शहरात 11 जानेवारी 1966 रोजी एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. पाच भावंडं आई-वडील घरात होते. आई पण अपंग होती वडील फक्त एक ते कमवणारे तरी पण आईने कधीही परिस्थितीचा विचार केला नाही. कोंड्याचा मांडा करुन खूप जपले असे करता करता एक दिवस हार्ट अटॅक ने अचानक वडिलांचा मृत्यू झाला. परंतु आईने कुठेही न खचता. कोणाकडे न हात पसरवता. तिने एक महिन्यात साडीचा पदर खोचून कष्ट करणे सुरुवात केली. व सर्व भावांना खूप चांगले संस्कार देऊन मोठे केले 1979 मध्ये 120 रुपये प्रति महिनाप्रमाणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जेवणाची मेस चालू केली. अन्य भाऊ पण काम करत होते. परंतु आईने घरात असल्याने मेस केली, खूप कष्ट केले. एखाद्या कॉलेजमधील मुख्याध्यापिका प्रमाणे मी सर्व वस्तू बनविण्यास आईच्या हाताखाली तरबेज झालो. जेणेकरून माझी माझ्या आईनेच हॉटेल मॅनेजमेंट कोर्स घरात पूर्ण करून घेतला. यात शंकाच नाही. व तिच्यामुळेच मी आज एवढे सर्व खाद्य पदार्थ उत्तम चविष्ट बनू शकतो धन्य आई तुझे उपकार 1991 मध्ये लग्न झाले पाच भावंडांत मुळे घर छोटे पडू लागले. त्यानंतर माझ्या भावांनी मी घरात काम करत होतो. भरपूर आजारपण घरात आली परंतु या सर्व गोष्टीत धर्मपत्नी सौ सरिताने खूप खूप साथ दिली. कुठल्याही प्रकारची जिद्द मागणी केली नाही. आणि संसारात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत भक्कम पणे पाठीशी उभी राहिली. व त्यामुळेच मी आजचा दिवस बघू शकलो तेरा साथ है तो मुझे क्या कमी या गाण्याची पूर्णता तिने मला साथ दिली. मला दोन मुले( पियुष व सुयश)आहेत मला सून व नात पण आहे . माझी मुले त्यांनी सुद्धा खूप माझ्या परिस्थितीत हालाखीची परिस्थितीशी सामना केला आहे. पण आता दैव कृपेने सर्व छान आहे. व त्यातच समाधान मानून परिवार आनंदाने जीवनाचा आनंद घेत आहे.

Previous articleशिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!
Next articleपाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!