Home Breaking News शिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!

शिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

खामगाव:-वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.
शिवांगी बेकर्स चा परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कंपनीच्या परिसरात आंबा, जांभूळ, आदी फळझाडे तर कडूनिंब यांसारखी औषधी वनस्पती बहुउपयोगी झाडे शिवांगी बेकर्स चे संचालक रितेश केडिया,पारले ऑफिसर सचिन पाठक,व कर्मचाऱी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणाच्या वेळी अभय अग्रवाल, रितेश केडिया, सचिन पाठक,एस एफ खान, शैलेंद्र सिंघेल आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous articleमा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.
Next articleअपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप