Home कृषीजागर मा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.

मा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 19 जुन 2022

मौजे रमनवाडी तांडा येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरपंच सुनिल शिरडे, उपसरपंच वसंतराव जाधव, ग्रा.पं.सदस्य दिलीपदादा आडे यांनी *माजी जि.प.सदस्य सुभाषदादा राठोड* यांच्याकडे पाठपुरावा करून बोअर साठी सहकार्य करण्याची मागणी केली होती.ती त्यांनी पुर्ण केली. व दिनांक १७ जुन रोजी नविन बोअर मारण्यात आला. सुदैवाने पाणीही भरपुर लागले. पण बोअर मारुन मोटारी, पाईप व ईतर साहित्यांची अडचण भासत होती. सर्वांच्या सुखदुःखात धावुन जाणारा आपला माणुस म्हणुन, सवना ज. नगरीचे विद्यमान संरपंच तथा कृ.उ.बा.चे. मा. सभापती तेव्हा बोअर साठी लागणारी आवश्यक मोटार-पाईप इतर सर्व साहित्यासाठीची मदत मा.सभापती परमेश्वर गोपतवाड यांनी केली, यावेळी समस्त रमणवाडी तांडा वासियांतर्फे परमेश्वर गोपतवाड यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गावातील सर्व नागरीक उपस्थित होते.

Previous articleहेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!
Next articleशिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!