Home कृषीजागर हेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!

हेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!

त्रुटीचे कळेना कारण
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- भारत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांना शेती पिके घेण्यासाठी काही अंशी आर्थिक मदत व्हावी याकरीता केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालू केली. यात, वर्षाला चार महिन्याच्या फरकाने तिन हप्त्यात प्रति हप्ता २००० रुपये या प्रमाणे एकूण ६००० हजार रुपये मदत बॅंक खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना ११ हप्ते पाठवण्यात आलेत. काहींनी उशिरा नोंद केली त्यांना ११ हप्त्यापेक्षा कमी हप्ते मिळाले असतील तो भाग वेगळा. या मध्ये काही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत काही हप्ते पाठवले परंतु, मागच्या १० व्या हप्त्यापासून अनेक शेतकऱ्यांना “‘पेमेंट प्रोसीड” स्टेटसवर ठेवून खात्यात निधी पाठवला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळाला. पण, बरेच शेतकरी असे आहेत की, ते आतापर्यंत पात्र असूनही कोणतेही कारण नसताना केंद्र सरकारच्या एन आय सी सेंटवरुन हलगर्जीपणामूळे हप्ते पाठवणे बंद केले आहेत. त्यांच्या नावापुढे पेमेंट प्रोसीड करुनही मदत निधी खात्यात जमा होत नाही. यासंबंधी, वंचित शेतकऱ्यांनी ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयातील पि एम किसान कक्षातील कर्मचाऱ्यांना समस्या सांगितली असता त्यांनी आपले सरकार सि एस सी सेंटवरुन पि एम किसान पोर्टलमध्ये हेल्प डेस्क मध्य जावून त्यात हप्ते न मिळाल्याची तक्रार करण्याचे सांगितले.त्यावरुन सबंधित वंचित शेतकऱ्यांनी तक्रार केली.मात्र तरीही मदत निधी खात्यात वर्ग झाला नाही. शिवाय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हेल्प सेंटर संपर्क क्रमांक कधीच लागत नाहीत. त्यामुळे हप्ते का मिळत नाहीत? याचे उत्तर कोठेच मिळत नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना ही योजना “वा-यावरील वरात” असीच वाटत आहे. या योजनेत दुजाभाव केला जात असल्याची ओरड सबंधित शेतकऱ्यांतून केली जात आहे. या बरोबरच निधी – मदत न मिळण्याची त्रुटी किंवा कारण काय आहे? हे ही सांगितले किंवा कळवले जात नाही. सदरील योजनेच्या अधिकृत कर्मचा-याचा फोनही येत नाही. त्यामुळे आशा शेतकऱ्यांना आपणास हप्ता का मिळत नाही? याची माहिती अथवा कारण समजत नसल्याने मदतीपासून वंचित राहीलेले शेतकरी सरकावर हिरमुशले आहेत. तसेच ज्या त्या गावचे नेमून दिलेले नोडल अधिकारी काहीच मदत करीत नाहीत. तहसीलदार यांच्याकडून मदत केंद्र चालू नसल्याने समस्या सांगावी कुणाला? असा यक्ष प्रश्न आहे. महसूल खात्याकडून त्रुटी कळवीली तर शेतकरी त्याची पूर्तता करु शकतील. जेणेकरुन त्यानंतर तरी मदत प्राप्त होवू शकेल. परंतु, तसे काही होत नसल्यामुळे मदत वंचित शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर नाराज झाले असल्याचे दिसून येत आहे. याकडे परभणीचे जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना आखून वंचित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या व्यतिरिक्त, ज्यांना ११ वा हप्ता पाठवण्यात आला त्या पैकी ब-याच शेतकऱ्यांना पूर्वी नोंदून दिलेल्या बॅंक खात्यात मदत वर्ग न करता आधार लिंक असलेल्या दुस-याच बॅंक खात्यात निधी वर्ग करण्यात आला आहे. ज्या खात्यात निधी पाठवला गेला त्या खात्यात देवाण घेवाण व्यवहार बंद असल्याने ही निधी रक्कम सबंधित बॅंकेने कपात केली असल्याने सदर मदत रक्कम वाया गेली आहे. यामुळे आशा काही शेतकऱ्यांचे नाटक झाले आहे.

Previous articleभाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!
Next articleमा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.