Home Breaking News रोशन राहुल कांबळे चे दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन

रोशन राहुल कांबळे चे दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन

हिमायतनगर(नांदेड) -कृष्णा राठोड
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल दि १७ जून रोजी दुपारी १ वाजता लागला.यात अनेक विद्यार्थी – विद्यार्थीणींनी भरघोस गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.नांदेड येथील भारत मातेच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सुपुत्र असलेला रोशन राहुल कांबळे याने दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे.
केंम्ब्रिज विद्यालय नांदेड येथे दहावीत शिक्षण घेणारा रोशन राहुल कांबळे या विद्यार्थ्याने दहावीत घवघवीत यश संपादन केले.याबाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी अभिनंदन केले.रोशन ने उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल जि. प.हायस्कूल तामसा चे मुख्याध्यापक श्री संभाजीराव चोखाजी वाठोरे व दीक्षाताई वाठोरे यांनी रोशन चा पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार केला.वडील राहुल कांबळे,आई सीमा कांबळे,डॉ.संदेश नांदेडकर,मुख्याध्यापक संभाजीराव वाठोरे,शिक्षिका बेबीनंदा सोनवणे, लताताई हिंगोले,दीक्षाताई वाठोरे,विजय बगाटे,राजरतन वाठोरे, सुमेध वाठोरे,चंद्रमनी वाठोरे,पत्रकार विजय वाठोरे यांच्यासह अनेकांनी रोशन च्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleखामगांवच्या जनुना तलावात सापडला युवकाचा मृतदेह!
Next articleनातं प्रेमाचं