आमदारांचे आंदोलन कुचकामी…..
हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड
हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161अ हा रस्ता मे.सुनिल हायटेक कंपनी परभणीचें आमदार रत्नाकर गुट्टे गंगाखेड यांना या कामांचे टेंडर मिळाल्यानंतर त्यांनी पोटगुत्तेदार मे.राही कन्ट्रक्शन कंपनी नागपूर येथील राठी नामक राजकीय वलयप्राप्त ठेकेदारांला सन2018 ला वर्कऑर्डर मिळुन चार वर्षापेक्षाही जास्त कालावधी होऊन गेलाआहे. परंतु हिमायतनगर शहरातून गेलेल्या महामार्गाचे काम अद्याप पर्यंत पुर्ण झालेले नाही.मागील पावसाळ्या सहआजही तहसिल कार्यालय,रेल्वे स्टेशनकडे तसेच शहरातून किनवट- नांदेडकडे जात असलेली वाहने अनेक वेळा रस्त्याच्यां चिखलात रुतून बसल्याने वाहने अडकून पडलीआहेत.तर उन्हाळ्याच्या दिवसात धुळीने जनसामान्यांचे जीवन धोक्यात आलेआहे.धुळीच्यां कणाने डोळ्याचेंआजारात वाढ,नागरीकांना सर्दी,खोकल्याचा त्रास सोसावा लागत आहेत.या रस्त्याचे काम जलदगतीने होण्यासाठी हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रियआमदार माधवराव पाटिल जवळगांवकर यांनी भव्य रास्तारोको आंदोलन केले होते. परंतु त्यांचे हे आंदोलन कुचकामी ठरले असल्याचे शहरातील नागरिकांतुन बोलले जात आहे. या आंदोलनाचा परिणाम काहीचं दिसुन आलेला नाही,असे जनतेकडून सांगितले जात आहे.एका विधानसभेचे एक लाख मते घेऊन नेतृत्व करत असलेल्या आमदारांच्या शब्दाला न जुमानता कंत्राटदार केराची टोपली दाखवत असतील,तर पोटगुत्तेदार किती मुजोर, व निरग्गठ्ठ, आहे,याची प्रचिती यावरून दिसून येते.त्यांना केंद्रीय भुपुष्ठ राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांचें पाठबळावर हा प्रकार करीत आहेत का?असा सवाल उपस्थित होतआहे. तर सर्वसामान्य नागरीकांचा विचार कोण करणार हा मोठा प्रश्न शहरातील नागरीकांपुढे पडला आहे.हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटिल यांना तर हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचे,अडीअडचणीचें काही देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत.
खासदार हेमंत पाटिल हे हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम का वेगाने का होत नाही, याविषयी साधी चौकशीही करत नाहीत,केंद्रीय राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांना भेटून हिमायतनगर रस्ता विषयावर चर्चा करावी तर लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा तांराकित प्रश्न मांडुन केंद्र सरकारला धारेवर धरले पाहिजे.तालुक्यात विविध विकास कामांचे प्रश्न, रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त तिकिट खिडकी,रेल्वेने प्रवास करणाऱ्या जनतेला पसेंजर रेल्वेचें तिकीट न देता एक्सप्रेसचें तिकीट देवुन आगावु पैसे घेतले जाते आहे.ही रेल्वेकडून शुध्द फसवणूक होते आहे.वैष्णवी केंद्रीय रेल्वेमंत्री,राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील नवी दिल्ली यांना हा विषय कोण सांगणार,हि सर्वात मोठी शोकांतीका म्हणावी लागेल.कालचं पाऊस झाल्याने श्रीपरमेश्वर मंदीराच्यां कमानी पासुन ते तहसिल कार्यालय, रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्याची पुन्हा एकदा दुर्दशा झाली असल्याने त्यांचा फटका नागरीकांना बसत असुन, नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.रस्ताचे संबंधीत काम करत असलेले राठी नामक राजकीय वलयप्राप्त कंत्राटदार कोणाचेच ऐकायला तयार नसल्याने एक-दीड कि.मीचा रस्ता कधी पुर्ण होणार?यांचे भविष्य कोणालाच सांगता येणार नाही.केवळ राजकीय अनास्था, प्रशासनाची हतबलता,राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड कार्यकारीअभियंता, उपविभागीय अभियंता,भोकर शाखा अभियंता यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे शहरवासीयांसह इस्लापूर,जलधारा,बोधडी बु.,गोकुंदा, किनवट या मार्गावर असलेल्या प्रवासी वर्गाला राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांचा विकास होत असताना त्रास होता कामा नये.याकडे केंद्रसरकार व
सरकारमधील सर्वचं लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यांना दिसुन येत नाही काय?असे प्रश्न मतदार विचारत आहेत.
कृष्णा राठोड
भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी , हिमायतगर
मो.📲 ९१४५०४३३८१