Home Breaking News कल्याण डोंबिवली महानगर पालिकेरील धडक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेरील धडक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

संघपाल कांबळे सरसमकर यांचे आवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड
तरुण मनाच्या बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेना तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १७ जून २०२२ रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर काही प्रमुख मागण्यांसाठी धडक मोर्चा निघणार आहे.या धडक मोर्चाला बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन सेना कला मंच चे संघपाल कांबळे सरसमकर यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या भोंगळ अन नुसत्याच आश्वासन देणार्या कारभारावर संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगर पालिका विरोधात आवाज उठवला असून जनतेत संतापाची लाट उसळली आहे.यातच रिपब्लिकन सेना तर्फे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दि १७ जून २०२२ रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकावर काही प्रमुख मागण्यांसाठी धकड मोर्चा चे आयोजन केले आहे.यात डोंबिवली कल्याण रस्ता रुंदीकरनात बाधित १०८ परिवाराचे पुनर्वसन करावे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे गोलवली येथे झालेले अतिक्रमण निष्काशीत करावे ,महानगर पालिकेतील अनधिकृत घरे देणाऱ्या अधिकाऱ्यांची आयोग नेमून चौकशी करावी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण ची जागा वाढवून मिळावी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेतील कचोरे कल्याण येथील वसाहतीत सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध कराव्यात,कल्याण ग्रामीण २७ गावे देसलेपाडा डोंबिवली येथे मुबलक पाण्याची व्यवस्था करावी व पीडित गायकवाड कुटुंबास महानगर पालिकेत नोकरीला घ्यावे या मागण्यासाठी धडक मोर्चा निघणार आहे.यासाठी रिपब्लिकन सेना तर्फे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा ने आयोजन केले असून बहुजन जनतेच्या न्यायासाठी हा मोर्चा निघणार आहे.या मोर्चास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सागर डबरासे साहेब,कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे,विक्रम खरे,आनंद पारटूले,लक्ष्मण खंदारे,रिपब्लिकन सेना कला मंच चे संघपाल कांबळे,कल्याण शहर अध्यक्ष दामू कामाजी कउतकर हे उपस्थित राहणार आहेत.या धडक मोर्चाला बहुजन समाजातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मागण्या मंजूरीच्या यशस्वीतेसाठी आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन रिपब्लिकन सेना कला मंच चे अध्यक्ष संघपाल कांबळे सरसमकर यांनी केले आहे.

Previous articleमृग नक्षत्राने मारली दडी, पावसाळा लांबला,शेतकरी चिंतातूर!
Next articleजवळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक आदर्श गाव बनवन्याची सुवर्णसंधी ..