Home Breaking News विजाच्या कडकड्यासह मुसळधार पावसात,दुधड येथे वीज पडून बैलाचा मृत्यू .

विजाच्या कडकड्यासह मुसळधार पावसात,दुधड येथे वीज पडून बैलाचा मृत्यू .

हिमायतनगर |कृष्णा राठोड

तालुक्यातील मौ. दूधड येथे आज दिं 11 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पांडुरंग आंनदराव सूर्यवंशी यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने एक बैल दगावल्याची घटना घडली आहे..

दूधड सोनारी परिसरात अचानक 11 जून शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वारे विजाच्या कडकडाटासह पाऊसाला सुरुवात झाल्याने दूधड येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव सूर्यवंशी गट क्र. 275 यांच्या शेतात रोजच्याप्रमाणे खुट्याला बांधलेल्या एका बैलावर संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला आहे.
या मध्ये सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते..
तरी संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दख्खल घेवून तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून देण्यास सहकार्य करावे..

Previous articleमनरेगा सिंचन विहीरींची देयके रखडली, शेतकरी हैराण!
Next articleप्रतिक्षा पावसाची !