Home राजकारण शेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!

शेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!

..दत्तराव काळबांडे .बालाजी काळबांडे.ओमकार काळबांडे

सामाजिक कार्यकर्ते अगंदराव काळबांडे यांचे मनोगत
—————-
परभणी, (आनंद ढोणे पाटील) – शेतकरी हा संपूर्ण जगाचा अन्नदाता आहे. तो उन्हा तान्हात थंडी पावसात, रात्रंदिवस एक करुन काबाडकष्ट करतो.शेतकरी टिकला तरच देश अन् जग टिकेल, आज शेतकऱ्यांच्या समस्येवर फुंकार घालण्यासाठी कुणाकडे वेळ उरला नाही. तरीही आमच्या सारखे तरुण शेतकऱ्यांची मुले शेतक-याच्या पदरात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याचे काम करीत आहेत. ग्रामीण भागातील शेतक-याचे हित साधणारी ही जिल्हा मध्यवर्ती बँक असते. या बॅंकेतून कधी कधी पात्र शेतक-यास पिक कर्ज दिले जाते. परंतु, येथेही तोंडे पाहून कामे होताना दिसतात. शेतकऱ्यांना गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मध्यस्थीने पिक कर्ज वाटप केले जाते. त्याकरिता चौफेर विकासाचा दृष्टीकोन असलेल्या जनकल्याणकारी निष्कलंक, निष्पक्षपाती व्यक्तींच्या हाती सोसायटीची सुत्रे दिली तर आम्ही सर्वसामान्य, गोरगरीब गरजू शेतकरी सभासदांना निश्चितपणे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके मार्फत ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या शेतकरी सभासदांना मिळवून देण्यासाठी सदा अग्रेसर राहू, असे मनोगत ममदापूर येथील शेतकरी विकास पॅनलचे सर्वेसर्वा अंगदराव काळबांडे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले. ममदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकी करीता १२ जून २०२२ रविवार रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून येथे मयत वगळता २१० शेतकरी सभासद आपला हक्क बजावणार आहेत. येथील सुजाण सभासद शेतकऱ्यांचा कल शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने दिसून येत आहे.यात सर्वसाधारण मधून ८, महिला प्रतिनिधी २ तर अनुसूचित वर्गातून १ अशा ११ संचालक निवडून द्यायचे आहेत. शेतकरी विकास पॅनलकडून काळबांडे अंगद हानवता, काळबांडे अंबादास नारायण, काळबांडे बबन तातेराव, काळबांडे बळीराम मुंजाजी, काळबांडे भागवत बालाजी, काळबांडे राम मुंजाजी, काळबांडे विठ्ठल सोपान, काळबांडे शिवाजी निळकंठ तर महिला मधून काळबांडे पार्वतीबाई मोतीराम, काळबांडे लक्ष्मीबाई दतराव आणि अनुसूचित वर्गातून रणवीर दिक्षा संजय हे उमेदवार निवडणूक रिंगणात आसून पॅनलप्रमूख म्हणून दत्तराव काळबांडे, संभाजीराव काळबांडे, शिवाजी काळबांडे, बालाजी काळबांडे, हरिभाऊ काळबांडे, ओमकार काळबांडे,सह आदी शेतकरी सभासद कार्यकर्ते शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सदर सोसायटी निवडणूकीसाठी सचिव अशोक सातपुते काम पाहत आहेत.

Previous articleप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित!
Next articleनांदेड जिल्हा परिषदेचा वरीष्ठ कृषि अधिकारी.. हिमायतनगर तालुक्याचा काॅलीटी कंट्रोलर कसा?