Home कृषीजागर खरीप हंगामात हिमायतनगरची बाजारपेठ फुलली !

खरीप हंगामात हिमायतनगरची बाजारपेठ फुलली !

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 जुन 2022

👉 फेरफटका

” काठीनं.. घोंगडं..घेऊ.. द्या की रं….
मला.. बि.. बाजाराला ( जत्रला) येऊ द्या कि..रं.”

अशी जुनी गाणी अनेकांनी ऐकली असेल..पण सध्या खरीप हंगाम 2022 साठी विविध शेतीविषयक लागणा-या साहित्याची खरेदी करण्यासाठी आमचा बळीराजा…
खते, बि.. बियाणे, औषधी, प्लास्टिक कापड, टिनपत्रे, सिमेंट पोल, लाकडी बली, रेगाटी, वखर, कोळपे, बैलाची दोर आदी….. साहित्य खरेदी करण्यासाठी हिमायतनगर शहरातील विविध दुकानात शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.


प्रत्येकांच्या हातात कापडी पिशवी सह अनेक शेतकऱ्यांनी शेतीविषयी लागणा-या साहित्याची, निविष्ठाची भोळ्याभाबड्या मनाने खरेदी करुन, चेह-यावरील हास्य ठेवत मी जगाचा पोशिंदा आहे.असेच भाव प्रत्येकांच्या मनात असावेत. असेच चित्र होते.
अजुन तरी जिल्हा परिषद शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टया आहेत. परंतु खाजगी क्लासेस वाल्यांनी यावर्षी कमालीची ग्रामीण भागात जाहिरात करुन, पालकांना आकर्षित केले आहे. एका विद्यार्थ्यांना वर्षाकाठी हे किती फीस घेतात. हे मात्र जाहिर न करता, आमच्याकडे विविध सोयी-सुविधा आहेत. म्हणुन भरमसाठ फिसमध्ये वाढ केली आहे.
शैक्षणिक साहित्याची खरेदी करतांना पालक वर्ग आपल्या पाल्यांना, आपण कुठंही कमी पडणार नाही याची काळजी घेतांना पालक दिसले.
👉 कारण..शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. असे म्हटले आहे.

आजतागायत नऊ जुन रोजी हिमायतनगर तालुक्यात कुठलाही मोठा पाऊस झाला नाही.
काही शेतकरी धुळपेरणी करुन आपले नशीब आजमावत आहेत.

👉ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित.
सध्यातरी हिमायतनगर तालुक्यात कधी ऊन तर कधी पाऊस, कधी पावसाचा सिडकांवा असाच खेळ चालू आहे.
एकंदरीत शेतकरी राजांची फसवणूक होऊ नये म्हणून आजपर्यंत कुणीही आवाज उठविला नाही. हेही विशेष आहे..

Previous articleपूर्णा-पांगरा रस्त्यावरील ३ किमी मेंटेनन्स रस्ता दूरस्तीचे काम केल्यानंतर उर्वरित साईड बर्मचे काम न करता गुत्तेदाराचा पोबारा
Next articleप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित!