Home Breaking News पूर्णा-पांगरा रस्त्यावरील ३ किमी मेंटेनन्स रस्ता दूरस्तीचे काम केल्यानंतर उर्वरित साईड बर्मचे...

पूर्णा-पांगरा रस्त्यावरील ३ किमी मेंटेनन्स रस्ता दूरस्तीचे काम केल्यानंतर उर्वरित साईड बर्मचे काम न करता गुत्तेदाराचा पोबारा

परभणी, (आनंद ढोणे पाटील) – पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा या एकूण ६ किमी अंतर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून रस्ता अक्षरश:चाळणी झाला होता. या रस्त्याचे नव्याने मजबुतीकरण करुन हाॅटमिक्स पध्दतीने काम करण्याची मागणी पांगरा, पिंपळा लोखंडे, वाई, लोण, मरसूळ येथील गावक-यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याकरिता गंगाखेड विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे, खासदार संजय जाधव आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्याकडे काही जणांनी निवेदन देवून देखील मागणी केली होती. यावरुन सदरील रस्त्याचा सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्हे करुन तसे अंदाजपत्रक सादर केले होते. यानंतर संपूर्ण ६ किमी रस्त्याचे मजबुतीकरण आणि हाॅटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याचे कंत्राट गत वर्षी गंगाखेड येथील एका गुत्तेदाराने घेतले होते. परंतु, चढाओढीमुळे कमी सर्वापेक्षा कमी रक्कमेत काम करण्याचे टेंडर सबंधित गुत्तेदाराने भरल्यामुळे त्यांना काम सुटले होते. मात्र, कमी निधी रक्कमेत रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्याचे काम परवडत नसल्यामुळे ते करण्यात आले नाही. त्यामुळे ते बजेट लॅप्स झाले. त्यानंतर यंदा २०२२ ला सिंगणापूरचे गुत्तेदार तथा खडाळा येथील डांबर प्लॅन्टचे मालक खिल्लारे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्यावरील ३ किमी अंतराचे खड्डे बुजवून त्यावर कोटींग आणि साईड बर्मचे काम करण्याचे टेंडर २६ लाख रुपये किंमती निधीस घेतले होते.त्यानंतर सदर कामाचा कार्यारंभ आदेश आल्यावर गुत्तेदाराने रस्त्यावरील खड्डे बुजवले तेही काही कठीण ढबर व काही माती मिश्रीत ठिसूळ मुरुम वापरुन खड्डे बुजवून त्यावर थातूरमातूर गिट्ठी चुरी व अल्प आईल मिश्रीत ढांबर टाकून खड्डे बुजवून त्यावर थातूरमातूरच पध्दतीने ३ किमी खड्डे बुजवलेल्या ठिकाणी कोटींग टाकली.थातूरमातूर काम केल्याने लगेच रस्ता उखडून जात आहे. तर काम केलेल्या रस्त्याच्या किनाऱ्यावरील साईड बर्म खड्डा पट्टे न भरता आपल्या लवाजम्यासह गाशा गुंडाळून पोबारा केला आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या काठाने वाढलेल्या काटेरी वेड्या बाभळा तोडून रस्त्यावर होणा-या वाहतूकीचा अडथळा कायम ठेवला आहे. हे त्वरित करण्याच्या मागणीसाठी पांगरा येथील माजी सरपंच उत्तमराव ढोणे पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांना भेटून करणार असल्याचे समजते.

Previous articleशेतकरी करत आहेत धूळपेरणी ला सुरुवात,…
Next articleखरीप हंगामात हिमायतनगरची बाजारपेठ फुलली !