Home कृषीजागर शेतकरी करत आहेत धूळपेरणी ला सुरुवात,…

शेतकरी करत आहेत धूळपेरणी ला सुरुवात,…

👉🏻मृग नक्षत्र लागून सुद्धा पावसाचा बेपत्ता.. पेरणीसाठी बळीराजा झाला सज्ज

हिमायतनगर प्रतिनिधी कृष्णा राठोड
/- दर वर्षीपेक्षा या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील टेंभी, अंदेगाव ,जवळगाव, पोटा, मंगरूळ, धानोरा, बोरगडी ,सिरंजनी, डोलारी, पळसपुर, घारापुर, खडकी, सह आदी गावातील शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाला दाद देत भरउन्हात अंगावर ऊन काढत खरिपाची पेरणी ,पूर्व मशागत करण्यास सुरुवात केली आहे मृग नक्षत्र प्रारंभ होताच पाऊस पडणार असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला होता परंतु दिनांक आठ जून रोजी मृगनक्षत्र आले तरी पण पावसाचा मात्र पत्ता दिसून येत नाही त्यामुळे शेतीची पूर्वमशागत करून आपल्या शेतातील काडीकचरा वेचून शेत नीट नेटके करून खरीप हंगामासाठी तालुक्यातील बळीराजा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे

हवामान खात्या ने दर्शवलेल्या अंदाजा नुसार रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल हे भाकीत मनात ठेऊन अनेक शेतकऱ्यांनी उन्हाच्या झळा सोसत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धूळपेरणी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या असल्याचे सध्या तालुक्यात चित्र पाहायला मिळत आहे पावसावरच अवलंबून असलेले खरीप हंगामा वर सर्व शेतकऱ्यांची मदार टांगली आहे गरज असेल तेव्हा लपणारा व गरज नसेल तेव्हा येणारा पाऊस अस्मानी व सुलतानी चा फटका यावर्षी पण बळीराजाला बसत असून दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला येत आहे आणि त्यातच शहरातील कृषी व्यापारी बाजारपेठेत बी-बियाणे व खतासाठी लागणारे पीक कर्ज वेळेवर मिळत नाही त्यामुळे ज्वारी, हरभरा, मका शासन वेळेवर खरेदी करत नाही व शहरातील भारतीय स्टेट बँक,महाराष्ट्र ग्रामीण बँके हे येथील शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज देत नाही त्यामुळे मेटाकुटीस अडकलेला शेतकरी घरच्या लक्ष्मी चे दागिने घेऊन पुन्हा एकदा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवत असल्याचे विदारक चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यात दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे काळ्या आईच्या भरोशावर आपल्या संसाराचा गाडा सुरू असतो पावसाने जर साथ दिली तर आपल्या शेतात उगवेल अन्यथा कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या पाचीला पुजलेला आहे हे पण तितकेच सत्य त्यामुळे धूळ पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असल्याचे दिसून येत आहे

 

भूमीराजान्युज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड
मो.९१४५०४३३८१

Previous articleरोजगार हमी योजना कक्षातील गैरहजर अधिका-याच्या खुर्चीला हार अर्पण करुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी केला सत्कार
Next articleपूर्णा-पांगरा रस्त्यावरील ३ किमी मेंटेनन्स रस्ता दूरस्तीचे काम केल्यानंतर उर्वरित साईड बर्मचे काम न करता गुत्तेदाराचा पोबारा