Home Breaking News रोजगार हमी योजना कक्षातील गैरहजर अधिका-याच्या खुर्चीला हार अर्पण करुन प्रहार जनशक्ती...

रोजगार हमी योजना कक्षातील गैरहजर अधिका-याच्या खुर्चीला हार अर्पण करुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी केला सत्कार

पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार!


रोजगार हमी योजनेअंतर्गत बिले काढण्याच्या कामात फोफावला भ्रष्टाचार


परभणी, (आनंद ढोणे पाटील) -जिल्ह्याच्या पूर्णा तालुका पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षातील सबंधित अधिकारी व अकाऊंट कक्षातील अधिकारी हे दि ८ जून २०२२ रोजी नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका प्रमुख शिवहार सोनटक्के, युवा तालूका प्रमुख नरेश जोगदंड, शहर प्रमुख संजय वाघमारे,उप , मंचक कु-हे, नितीन कदम हे जनतेच्या कामासाठी पंचायत समिती कार्यालयात गेले असता त्यांना रोजगार हमी योजना कक्षातील अधिकारी बनसोडे व अकाऊंट कक्षातील अधिकारी पाठक हे गैरहजर आढळून आले. ते सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना न देता किंवा रितसर रजा न घेता मनमानी पध्दतीने कर्तव्यात कसूर करत गैरहजर राहत असल्याचे समजले. त्यावरुन प्रहारच्या पदाधिका-यांनी तात्काळ पुष्पहार आणून तो गैरहजर कर्मचा-याच्या खुर्चीला अर्पण करीत खुर्चीचा सत्कार करुन निषेध केला. यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच धांदल पसरुन उपस्थित कर्मचा-यात खळबळ उडाली होती. सध्या, सिंचन विहीर, फळबाग कामाची बिले मस्टर काढणे, सबंधित लाभार्थी शेतकरी, कुशल अकूशल मजूर लाभार्थी यांच्या बॅंक खात्यात आनूदान रक्कम टाकण्याची कामे रखडली आहेत. विहिरींची कामे होवूनही आनूदान रक्कम कित्येक खेटे मारुनही मिळत नाही. तसेच नवीन फळबाग लागवड योजनेत फाईल दाखल करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असता. येथे कर्मचारी अनुपस्थितीत राहत असल्यामुळे शेतकरी परेशान होताहेत.याची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. आणि पर्दाफाश केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा तालुका प्रमुख शिवहार दादा सोनटक्के व त्यांची टिम सातत्याने जनकल्याणाच्या कामासाठी प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यशील असते. मग ते अपंगाच्या कल्याणासाठी असो की, निराधार व्यक्ती, शेतकरी यांच्याप्रती न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार टिम अग्रेसर राहून निर्भीडपणे, जनतेच्या पाठीशी राहून काम करीत असल्याने परभणी जिल्ह्यासह पूर्णा तालुक्यातील भ्रष्ट कर्मचा-यात धडकी भरली आहे.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयात रोजगार हमी योजना कामाची बिले मस्टर पेमेंट अदा करण्याची कामे ही कर्मचारी टक्केवारी घेतल्याशिवाय करीत नाहीत. त्यांना टक्केवारी रक्कम जमा करुन आणून देण्यासाठी काही दलाल आणि रोजगार सेवक मदत करीत असल्याचे शेतक-यातून बोलले जात आहे.गत अनेक दिवसांपासून रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार फोफावला आहे.सबंधीत कर्मचारी मस्टर काढून आनूदान निधी खात्यात वर्ग करण्यासाठी चिरीमिरी घेण्यात लखले आहेत. शेतकरी लाभार्थी नाईलाजाने दुस-याकडून व्याजाने पैसे काढून विहीरीचे खोदकाम व बांधकाम करीत आहेत. अनेकांच्या विहीरी खोदकाम, बांधकाम होवून पूर्ण झाल्यात तरी देखील आनूदान मिळत नाही. गावातील रोजगार सेवक शेतकरी लाभार्थी यांची लबाड तबाड बोलून पिळवणूक करीत आहेत. याचाही पर्दाफाश प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते करणार असल्याचे समजते.या सर्व भ्रष्ट कर्मचा-यांची परभणीचे कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ असलेल्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी रोजगार हमी योजना कामाची तात्काळ चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करीत शेतक-यांच्या सिंचन विहीरीचे आनूदान देण्यासाठी त्यांनी त्वरा करुन शेतक-यांना न्याय द्यावा तरच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावशाली ठरेल.

Previous articleथकीत पिक कर्ज नूतनीकरण केल्यास लगेच दुसरे कर्ज मिळणार
Next articleशेतकरी करत आहेत धूळपेरणी ला सुरुवात,…