Home कविता ” जगावेगळी ममता “

” जगावेगळी ममता “

जीवनातील आकांक्षांना
फुटावीत जणू हो पंख
किमया अशी करावी आता
मिळेल तयातून जीवना सुख…।।

जीवनभर जरी कष्टाने
मिळेल पोटाला भाकरी
किमया येऊ दया फळास
नका करू कुणाची चाकरी…।।

तोंडावर जेंव्हा गोड बोलती
मागे करती चुगली खोरी
” जगावेगळी किमया ” असावी
सुख मिळेल हो जीवनभरी…।।

आचार विचार शुद्ध असे
मन ही दर्पणापरी दिसावे
किमयेतुन प्रतिभा उमटावी
नसावे हो रूसवे फुगवे…।।

शुद्ध मनाचे शुद्ध विचार
अंगीकार करा कर्तव्याचा
उमटु दया ठसा असा की
उध्दार होईल जीवनाचा…।।

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

Previous articleतालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही
Next articleहिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.