Home समाजकारण नविन पिक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

नविन पिक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

👉 भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांचे आव्हान

मारोती अक्कलवाड सवनेरकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 24 मे 2022

हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी नवीन पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी 31 मे 2022 प्रयंत खालील कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे साहेब यांनी केले आहे.
नविन पिककर्ज घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नविन पिक कर्ज ज्या शेतकऱ्यांना घेयायचे आहे. अशा शेतकऱ्यांनी .
व लोकअदालत किंवा बॅक अदालत मध्ये ज्याचे थकित कर्ज पुर्णपणे भरले आहे.
आणि ज्या शेतकऱ्यांची महात्मा फुले कर्जमाफी योजनेत कर्ज माफ होऊन पावती मिळाली आहे. परंतु त्यांना अजुन नविन पिक कर्ज मिळाले नाही.
वरील सर्व शेतकरी बांधवांनी पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.
१) सातबारा, होर्डींग्ज 2022 ची
२) फेरफार नक्कल
३) आधारकार्ड झेराॅक्स
४) पॅनकार्ड झेराक्स
५) दोन पासपोर्ट फोटो
६) बॅक पासबुक झेराक्स
७) अर्ज
८) 100 रुपयांच्या बाॅन्डवर कर्ज
नसल्याचे प्रतिज्ञापत्र
९) कर्जमाफीची पावती इत्यादी
कागदपत्रे 31 मे 2022 पुर्वी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे असे हि ते म्हणाले.

Previous articleहिमायतनगर तालुक्यात 10:26:,26 खतांचा तुटवडा….
Next articleसिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू