मारोती अक्कलवाड पाटील
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 24 मे 2022
” जगाचा पोशिंदा शेतकरी”म
हि भावनीक उपमा कुणाच्याही सहज मनात दुःख देऊन जाते…
पण हिमायतनगर तालुक्यातील बळीराजाचे शेतीविषयक चित्र काहीसे वेगळेच आहे…
खरीप हंगामात 2022 या वर्षात भोळा शेतकरी राजा कापुस, हळद, सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या विविध पिकांची पेरणी करतो. पण हिमायतनगर शहरातील कृषि सेवा केंद्र चालकांनी एक नामी आणि चमत्कारिक शक्कल लढवली आहे.. 10:26:26 खत पाहिजे असल्यास त्यासोबत प्रत्येकी दोन बॅग मागे एक सल्फर या खतांची बॅग घ्यावी लागेल. अशी अट घातली.
👉 ” बाप देवु देना माय उपाशी राहू देना”. अशीच अवस्था हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे…….. देवा का? शेतकऱ्यांच्या जन्माला घातलाय तु…… अशी प्रतिक्रिया एका शेतकरी बांधवांने कंटाळुन भुमी राजा साप्ताहिक न्युज प्रतिनिधीशी दिली आहे…
👉 कुठे आहेत महाराष्ट्र शासनाचे तालुका कृषी अधिकारी…?
हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी हे हिमायतनगर तालुक्यातील स्थानिकचे आहेत… कुठे पाणी मुरते. त्यांनाच माहीत… येत्या दोन दिवसांत हिमायतनगर तालुक्यातील सर्वच कृषि सेवा केंद्रावर तालुका कृषी अधिकारी बालाजी शेनेवाड आणि त्यांच्या टिमने तालुक्यातील तमाम पत्रकारांना आणि शेतीविषयी तज्ञांना घेऊन खत, बियाणे यांचे काढुनी दाखवावे अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे…