Home Breaking News गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान

गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान

शेतकरी:- दामोदर वासुदेव गावंडे यांचा टाहो; गोरेगाव बु येथिल घटना

प्रतिनिधी:-योगेश घायवट वाडेगाव. येथुन जवळच असलेल्या गोरेगाव बु येथे गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांवर नुकसान झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव बु येथिल शेतकरी दामोदर वासुदेव गावंडे यांचा गुराढोरांचा गावातच असलेल्या गोठ्याला दिनांक विस मे रोजी च्या रात्री दिड वाजताच्या सुमारास गोठ्याला आग लागली तर गोठ्या समोरच बैलगाडी मध्ये वासुदेव गावंडे झोपले होते परंतु गावंडे यांना गाढ झोपेत असताना गोठ्यात बांधून ठेवलेले चार बैल अंदाजे किंमत दिड लाख रुपये दोन गाई एक वासरू अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये या गुरांना मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे

तर गोठ्यातील पन्नास कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या त्यामुळे संमधीत शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांनी बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर गोठ्याला आग कशामुळे लागली हे समजले नाही

कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या बैल जोडी तसेच दुधाची गाय वासरू व कोंबड्यां चे लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झाले आहे

Previous articleपाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..
Next articleनाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका अर्पण