Home Breaking News पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..

पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भागात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.

उन्हाची तिव्रता वाढत असल्याने हरीण, निळ,वानर,रोही यासारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत आहेत.
कारला शिवारात रविवारी शेतकरी काशिनाथ सोनबा रासमवाड यांच्या शेतात पाणी भरून असलेल्या बकेट मधील पाणी पित असतांना हरणाच्या गळ्यात बकेट अडकली असता तांराबळ केली मात्र बकेट निघाली नाही त्यातच हरणाचा मृत्यू झाला

या घटनेची माहिती शेतकरी यांनी वनरक्षक अमोल कदम यांना दिली असता त्यांनी वाशी भागाचे वनरक्षक नारायण गिते यांना कळविताच पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के,वनमजुर अहेमद ,प्रकाश पवार, प्रकाश मेंडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून श्वच्छेदन केले . शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी पानवठे करून रजनी ठेवल्यास पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे जिव वाचतील असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी केले आहे.

Previous articleनाथ समाजाचे भव्य मेळावा आयोजन….
Next articleगोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान