शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात होणार नुकसान !
अकोला:- पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणा वाडेगाव येथे गट क्रमांक ५ मधील सरकारी शेत रस्ता अडविल्याने शेतात असलेल्या पिकाचे नुकसान होत असल्याने स्थानिक हिंगणा येथील शेतकरी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे.
वाडेगाव येथील रवींद्र डिगाबर सरप यांचे शेत हिंगणा शेत शिवारात असून त्यांच्या शेतातून सरकारी नकाशा नुसार मध्यभागातून रस्ता होता, परंतु त्यांनी ३५ वर्ष झाले लिंबू लावल्यामुळे शेताच्या दक्षिण दिशेला त्यांनी रस्ता दिला होता.तेव्हा पासून हा रस्ता सुरू होता.आज पर्यत कोणतीही तक्रार नव्हती परंतु २५ एप्रिल २०२२ पासून त्यांनी काट्या टाकून रस्ता बंद केला त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्याचे कांदा पीक काढणीला आले आहे.मजूर व मालकाला अजिबात शेतात जाऊ देत नसल्याने कांदा पीक सडण्याच्या मार्गावर आहे.हा रस्ता लवकर सुरू न झाल्यास कमीत कमी ४ ते ५ लाखाचे नुकसान प्रत्येक शेतकऱ्याचे होणार आहे.अशी तक्रार ओम विजय उजाडे,किसनराव देवराव उजाडे,बालकृष्ण राहुडकार, प्रदीप उजाडे, ज्ञानदेव शिवाजी उजाडे,देवलाल शिवाजी उजाडे,नारायण रामकृष्ण कारस्कार,श्रीकृष्ण रामभाऊ इंगळे,बळीराम रामभाऊ इंगळे,विठ्ठल रामभाऊ इंगळे,आदी शेतकऱ्याच्या सह्या आहेत..
दिलेल्या तक्रारी नुसार पातूर चे तहसीलदार यांनी हिंगणा येथील गट क्रमांक ५ मधील रस्ता मोकळा करण्या साठी मंडळ अधिकारी बाभूळगाव ,व तलाठी यांना तत्काळ आदेश देण्यात आले आहेत.परंतु तो रस्ता सुद्धा मोकळा करण्यात आला नाही.