👉 पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनी राजीनामा द्यावा..
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 17 मे 2022
👉 विशेष नांदेड जिल्हा संपादकीय
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना आणि चांगले निर्णय घेत आहे.
परंतु संबंध जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी निर्णय घेत असेल, तर… पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्ह्यातील तथा तालुक्यातील विद्यमान संरपंच आणि ग्रामसेवक यांना उचलता येत नसेल तर….. जिल्ह्यातील पालकमंत्री आणि महाराष्ट्रातील ग्रामीण विकास मंत्री हे काय? करीत आहेत.. असा थेट सवाल…. हिमायतनगर तालुक्यातील अनेक संरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विचारला आहे.
ग्रामपंचायत कार्यालय सदस्य प्रतिनिधी आणि इतर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य बांधवांनी आमच्या प्रतिनिधींना प्रतिप्रश्न विचारला आहे..
यांची सखोल चौकशी व्हावी. यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सदस्यांनी विचारला आहे..
त्रीस्तरीय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी रचना असतांना यांना ग्रामीण भागातील समस्या आणि मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार निधीची पुर्तता करते. त्याच सरकार मधील विद्यमान मंत्री महाविकास आघाडी सरकारचे आहेत. मग कुठे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत कार्यालय यांच्या खात्यावर येऊनहि तालुक्यातील संबंधित संरपंच आणि ग्रामसेवक यांना उचलता येत नसेल तर…… दुर्दैवाने कोणाला दोषी ठरवावे.. हाही यक्ष प्रश्न उपस्थित होतो..
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध होत नसेल ना… जिल्ह्यातील पालकमंत्री आणि महाराष्ट्रातील ग्रामीण विकास मंत्री यांनी राजीनामा दिलेला बरा.. अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यातील आणि विशेषत: हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य आणि नागरीक विचरत आहेत.