Home Breaking News छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतिनीमीत्ताने हिंदू सेवा संस्थे कडुन ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतिनीमीत्ताने हिंदू सेवा संस्थे कडुन ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप

कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतिनीधी
बाळापुर

बाळापुर – शहरात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख म्हणजे एकदाही पराभव न स्विकारणारे , एकदाही माघार न घेणारे , एकदाही तह न करणारे , 120 लढाया लढणारे सर्वच्या सर्व जिंकणारे जगातिल पहिले बालसाहित्यीक ,ज्यांनी बुधभूषण , नखशिख, नायिकाभेद ,सातसतक ,इत्यादी ग्रंथाचे लेखन करणारे , जंजिरा जिंकण्यासाठी समुद्रबुजविणारे , जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट तयार करणारे , डोगर पोखरुन शेतिला पाणी पुरविणारे , आठ भाषांवर प्रभुत्व असणारे विर पराक्रमी यौद्धा , बुद्धिमान , साहित्यीक आणी वढिल धार्याचा मान ठेवणारे अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची ओळख होती .आणी या जयंतीचे औचित्य साधुन शहरामध्ये असलेल्या ग्रामीण रूग्णालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती च्या
निमीत्ताने हिंदू सेवा संस्थेच्या वतिने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले .त्यावेळी रुग्णालयात विशाल ठाकूर , निर्भयसिंह ठाकूर ,विरू ठाकूर,विठ्ठल तितूर, राजेंद्र हिरळकर,डिगांबर धनोकार , अजित ठाकूर , अनिकेत ठाकूर , सुरज ठाकूर, रितेश ठाकूर , संदिप वानखडे आणी रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते . हिंदू सेवा संस्थेच्ये आजी माजी पदाधिकारी त्या कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous articleछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम सर्व समाजबांधवांनी साजरा करावा…. गोपाल कलाने
Next articleरानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी.