Home Breaking News पैनगंगा नदीतून अवैध्य रित्या होतेय रेतीची चोरी विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ट्रैक्टर...

पैनगंगा नदीतून अवैध्य रित्या होतेय रेतीची चोरी विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ट्रैक्टर रेती माफियांनी काढला पळ

 प्रतिनिधी अंगद सुरोशे

हिमायतनगर भागातील काही रेती तस्करांनाही पैनगंगा नदीतील लिलाव न झालेल्या विरसनी बंधाऱ्यापासून रेतीचोरीचा गोरखधंदा या भागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या संगनमताने सुरु केला आहे. असे असताना देखील हिमायतनगर भागातील अधिकारी स्वार्थापोटी कार्यवाही करण्यास तयार नसले तरी विदर्भातील महसूल पथक आल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील ५ ते ७ ट्रैक्टर रेती माफियांनी पळ काढला आहे. अशी माहिती विदर्भातील एका अधिकाऱ्याने भूमीराजा न्यूज  बोलताना दिली असून, यावरून हिमायतनगर महसूल अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षपासून विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरून चोरीच्या मार्गाने राजकीय वरद हस्त असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील विविध गावच्या ट्रैक्टर वाहनधारकांनी रेतीचोरीचा गोरखधंदा चालविला होता. याबाबत वर्तमानपत्रातून आवाज उठविल्यानंतर यंदा महसूल विभागाने रेती लिलावाचा अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या पुढाकाराने ५ रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले आहेत. तर अनेक रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या घाटावरून राजकिय वरद हस्ते असलेल्या लाही वाळू दादांनी आपला रेती चोरीचा गोरखधंदा सुरु केला आहे. या प्रकारची माहिती संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यास असताना देखील केवळ खाबुगिरीची सवय जडल्यामुळे स्वार्थापोटी शासनाच्या महसुलावर डल्ला मरणाऱ्यांना अभय देत आहेत.

तर ज्या ठिकाणी लिलाव झाले ते ठिकाण सोडून अन्य ठिकाणाहून रेतीचा उपास करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरु केला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विदर्भातील महसूल पथकाने हिमायतनगर हद्दीतील लिलाव न झालेल्या ठिकाणावर छापे मारून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मात्र हिमायतनगर तालुक्यातील महसुलाचे पथक कुंभकर्णी झोप घेऊन आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप हिमायतनगर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी करून हिमायतनगर महसूल विभागाची पोलखोल केली आहे. नुकतीच काही दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील एका वाहनावर कार्यवाही केल्याची माहिती उमरखेड महसूल प्रशासनाने भुमीराजा न्युज शी बोलतांना दिली आहे.

Previous articleहिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय आणि म्हैस ठार
Next articleछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम सर्व समाजबांधवांनी साजरा करावा…. गोपाल कलाने