हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
11मे बुधवार रोजी नाशिक मधील अखिल भारतीय ओबीसी महासभे च्या नाशिक मधील प्रमुख पदाधिकारी यांची मिटिंग ओबीसी विचारवंत व वक्ते प्रा. श्रावण देवरे सर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.
यामध्ये ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्था मधील रद्द झालेले राजकीय आरक्षण, सरकारी कर्मचाऱ्याच्या पदोन्नती आरक्षणास दिलेली स्थगिती, शिक्षक भरतीतील ओबीसी च्या रद्द केलेल्या 50%जागा, टिईटी व टेट या शिक्षक पदाच्या परीक्षा करता भटके विमुक्त जाती ज़मातीचा खुल्या वर्गात समावेश करुन त्याच्या कडून वसूल केले जात असलेले वाढीव परीक्षा शुल्क, ओबीसी विदयाथ्री यांच्या थांबवलेल्या स्कॉलरशिप, या ओबीसी वर होत असलेल्या राजकीय, सामाजिक, शेक्षणिक अन्याया बाबत विचार मंथन करण्यात येवुन सर्वच पक्षाकडून ओबीसी चा विश्वासघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
या वरचा रामबाण उपाय म्हणजे ओबीसी चा स्वताचा राजकीय अजेंडा ठरवुन त्या दिशेने मार्गक्रमन करने यावर लवकरच पत्रकार परिषद घेण्यात येणार असून राजकीय दिशा जाहीर करण्यात येणार आहे.
या बैठकी मध्ये ओबीसी विचारवंत श्री. श्रावण देवरे सर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. नासिक जिल्हा अध्यक्ष गोरखनाथ आखाड़े, महिला जिल्हा अध्यक्ष विद्या घायतड, नाशिक जिल्हा संघटक हेमंत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विट्ठल जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शिरसाठ साहेब, सीनियर सिटीझन भास्कर घायतड़ साहेब यांनी बैठकीत आपले विचार व्यक्त केले.