Home Breaking News निधन वार्ता

निधन वार्ता

मारोतराव यलसटवार (सावकार) यांचे निधन….
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 10 मे 2022

👉 सवना ज गावांवर शोककळा,आज अंत्यविधी...

हिमायतनगर… तालुक्यातील सवना ज येथील सधन शेतकरी सर्वांच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी होणारे निष्ठावंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सवना ज गावासह तालुक्यात प्रसिद्ध असणारे मारोतराव तानाजी यलसटवार वय(५१) यांचे अल्पशा आजाराने ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा रेणुकाई हॉस्पिटल नांदेड मध्ये उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, तिनं बहिणी असा परिवार आहे.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वा अंत्यविधी सवना गावातुन निघून त्यांच्या एकघरी शिवा‌रातील शेतात १० वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची गणना होती. सवना ज गावाच्या समस्या सोडवण्यासाठी निस्पृह भावनेने काम करण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपर्यंत गावाचा जो काही विकास झाला.त्या विकासात मारोतराव यलसटवार (दाजी) यांचा मोलाचा वाटा होता.त्याच्या निधनामुळे सवना ज गावांवर शोककळा पसरली आहे.९ एप्रिल रोजी रात्रभर सवना गावातील नागरिकांच्या उपस्थितीत सवना ज,पार्डी ,एकघरी येथील भजनी मंडळांनी भजनाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Previous articleआमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleनांदेड_किनवट_राष्ट्रीय_महामार्गाचे काम संथ गतीने प्रशासनाचे दुर्लक्ष..