मारोती अक्कलवाड सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 03 मे 2022
सतत वृक्षतोड होत असल्याने, वातावरणातील बदल, कडक तापत असलेले ऊन्ह यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान जगण्यासाठी अवघड होत आहे.
संबंध जिल्ह्यात सुर्य आग ओकत असतांनाच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे रुग्णांना कमालीचा त्रास होत आहे. असे संबंधित एका रुग्णाने बोलुन दाखवले आहे.
दुषित वातावरणामुळे, वाढत्या कारखानदारी मुळे तसेच सततची होणारी वृक्षतोड यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा पारा वाढतच चालला आहे.
आज रोजी 43 अंश ते 44 अंश या स्थितीत सुर्य आग ओकत आहे.
या मे महिन्यात शेतकरी शेतीची मशागतीची पुर्ण कामे करत असतो, परंतु उन्हं तापत असतांना कोणीही शेतात काम करण्याची हिंमत दाखवत नाही.
सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत शेतकरी शेतात काम करीत आहेत.
एकंदरीत यावरून दिसून येते की सुर्य आग ओकत आहे.
एखाद्या लग्न समारंभात असो, सुखदुःखाच्या कार्यक्रमांत असो अत्यंत जिव्हाळ्याची पाहुणे मंडळी सांगत आहेत. उन्हं जास्त आहे बरं… लवकर घरी जा…
उन्हं होण्याच्या आधीच घरी पोहचा. असा प्रेमळ सल्ला देऊन उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. असा जणु संदेशच देत आहेत.