Home समाजकारण शहरात रमजान ईद चा सण उत्साहात

शहरात रमजान ईद चा सण उत्साहात

कृष्णा घाटोळ
भुमि राजा शहर प्रतिनीधी बाळापुर

बाळापुर शहरात रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे .रमजान ईद चा सन हा मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र सण आहे.शहरात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र आणि या नमाज पठणा मध्ये सर्व मुस्लिम बांधव झालेल्या चुकाची माफी अल्ला कडे मागत असतात.आणी या ईद च्या सणामुळे बाजार पेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दि . रमजान ईद चा सण हा कोरोणा काळात उत्साहात साजरा करता न आल्यामुळे मात्र हा सण आता उत्साहात साजरा करण्यात येत आहे.रमजान महिन्यातिल रोजे संपल्यानंतर ईद येते .ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात .

Previous articleसवनेकरांचे माझ्यावर असलेले प्रेम आशिर्वाद जन्मभर विसरणार नाही…गोपतवाड
Next articleसुर्य आग ओकतोय….