अमरावती प्रतिनिधी
रेस्ट हाऊस, बडनेरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संघटनेची विदर्भस्तरीय कार्यकारणी बैठक संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दलित मित्र उत्तमराव भैसने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे सरचिटणीस बी.के. खरात सर यांनी केले प्रास्ताविका मधून संघटनेचे ध्येय धोरण व संघटनेचे संस्थापक विजयजी अंभोरे यांच्या नेतृत्वाबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर सोशल फोरमचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष कृष्णा नाटेकर, सागर कलाने, जितेश अंभोरे, माजी सभापती सौ. गंगाताई अंभोरे, हरिनारायण भैसने, अरुण वानखडे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पोळकर, सुभाषभाऊ शिंदे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे साहेब यांचे भाषणे झाले. याप्रसंगी भातकुली पंचायत समितीचे माजी सभापती हरी नारायण भैसने यांची सोशल फोरमच्या विदर्भ अध्यक्ष पदी तर जितेश अंभोरे यांची विदर्भ सोशल मीडिया पदी निवड करण्यात आली. या बैठकीला अमरावती बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बुलढाणा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गजानन सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन शुभम खंडारे यांनी केले.