मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जगदीश जाधव यांचे आवाहन…..
हिमायतनगर
( नांदेड) कृष्णा राठोड
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे झाली तरीही या देशाचे मूलनिवासी असूनही अद्याप आम्हाला आमचा हिस्सा , मानसन्मान , हक्क , अधिकार बरोबर देण्यात आलेला नाही . यासह असंख्य मागण्यांसह गोर सेनेच्या वतीने ११ मे बुधवार रोजी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर क्रांतिकारी विराट मोर्चा हजारो जनसमुदायासमोर धडकणार आहे . या क्रांतिकारी विराट मोर्चाला नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोर सेनेचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जगदीश जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे . मागील कित्येक वर्षापासून या महाराष्ट्र मधील तमाम पीडित , शोषित , वंचित घटकांना न्याय मिळाला नसल्याने वारंवार सर्वसामान्यांवर अन्याय झाला आहे . शिवाय जातीनिहाय जनगणना , स्थानिक निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित रहावे , नॉनक्रिमलेयर अट रद्द करणे , सारथी व बार्टी धर्तीवर ओबीसी व व्ही.जे.एन.टी विद्यार्थीना सवलती देणे , जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे • अधिकार जिल्हा पातळीवर नं ठेवता विभागीय पातळीवर ठेवावे , जिल्हा पातळीवर फक्त अर्ज घेण्यात यावे यांसह आधी मागण्या घेऊन गोर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांचे आदेशानुसार क्रातींकारी विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार असल्याने तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव तसेच माजी , आजी खासदार आमदार , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , विविध संगटनेचे पदाधिकारी आदींनी येत्या ११ मे ला मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश जाधव (गोर सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नांदेड) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले आहे .